नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी बैठकांचा सिलसिला पाहायला मिळणार आहे. नवी दिल्लीत विविध बैठकांचं सत्र पाहायला मिळेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएच्या खासदारांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी पाच वाजता ही बैठक पार पडेल. या बैठकीत एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे सुद्धा सहभागी होणार आहेत.


दुसरीकडे एनडीएच्या बैठकीआधी विरोधी पक्षांचीही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. युपीएच्या घटक पक्षातील नेते या बैठकीला उपस्थित असतील. युपीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मीरा कुमार या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.