हैदराबाद : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रपतीपदासाठीचे एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यावर अल्पसंख्याकासंदर्भातील जुन्या वक्तव्यावरुन  निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 रामनाथ कोविंद यांनी मुस्लीम समाजाबद्दल 2010 मध्ये वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा संदर्भ देत ओवेसींनी कोविंद आणि भाजपवर निशाणा साधला आहे.त्यावेळी बोलताना त्यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन या देशातले एलियन्स आहेत, अशी टिप्पणी केली होती. 


रामनाथ कोविंद यांनी 2010 मध्ये एका कार्यक्रमात एक वादग्रस्त वक्तव्यं केलं होतं. ते म्हणाले होते की, मुसलमान आणि ख्रिश्चन या देशासाठी एलियन्स आहेत. याचाच अर्थ आपलं इथं अस्तित्वच नाही, असं हैदराबादमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना, ओवेसी म्हटलंय, तसेच यासाठीच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव दोघेही ड्रामेबाज असल्याचं त्यांनी यावेळी म्हणलं आहे. ओवेसींनी यावेळी रामनाथ कोविंद यांना समर्थन देणाऱ्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्यावरही टीका केली आहे