नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याचं कामकाज संपूर्णपणे पाण्यात गेल्याच्या पार्श्वभूमीवर एनडीएचे खासदारांनी वेतन आणि भत्ते स्वीकरणार नाहीत. याविषयीची घोषणा संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी केली.  


संसदेत सलग २३ दिवस कामकाज ठप्प


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत सलग २३ दिवस कामकाज न झाल्यानं आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोकाचा दुरावा निर्माण झालेल्याचं स्पष्ट आहे. कामकाज सुरळीत होऊ न शकल्यानं आता दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत. 


त्यात बुधवारी संध्यकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि एनडीएच्या घटक पक्षांच्या खासदारांशी चर्चा केल्यावर विरोधकांचा निषेध करण्यासठी वेतन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. संसदेतचं कामकाज रोखण्यासाठी संपूर्णपणे काँग्रेस जबाबदार असल्याचं अनंत कुमार यांनी म्हटले आहे.