मुंबई : अफगाणिस्तानची परिस्थिती अतिशय भयावह होत चालली आहे. अफगाणिस्तानातून अनेक नागरिक निघून जात आहेत. तेथील नागरिकांची परिस्थिती खूप गंभीर आहे. ही परिस्थिती अधिक स्पष्ट करणारा एक फोटो समोर आला आहे. एका विमानातून तब्बल 800 प्रवाशांनी प्रवास केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

150 सैनिकांची क्षमता असलेल्या मालवाहू विमान कार्गो जेटमध्ये तब्बल 800 अफगाणी नागरिक बसल्याचं दृष्य समोर आलं आहे. या फोटोतून तेथील परिस्थिती किती गंभीर असल्याची जाणीव होते. महत्वाची बाब म्हणजे ज्यावेळी विमानाच्या ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी सर्वांनी विमान आणि प्रवासी यांच्या सुखरुप प्रवासाकरता प्रार्थना केली. 


डिफेन्स वनने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री काबुलहून कुवैतकडे जाणाऱ्या यूएस एअर फोर्स सी -17 ग्लोबमास्टर III मध्ये अंदाजे 640 लोक घुसले. हे विमान अध्यक्ष बायडन यांच्या गृह राज्य डेलावेअरमधील डोव्हर एअर फोर्स तळाबाहेर कार्यरत असल्याचे सांगितले जाते. 



या विमानातून एवढ्या नागरिकांना घेऊन जाण्याची परवानगी नव्हती. मात्र तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या वादामुळे नागरिकांना या विमानातून प्रवास करावा लागला. यामुळे विमानातू एवढ्या नागरिकांना एकाचवेळी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, असे संरक्षण अधिकाऱ्यांनी डिफेन्स वनला सांगितले. 


आपण या आधी व्हायरल झालेल्या व्हिडीओत पाहिलं की, अफगाणिस्तानी नागरिक विमानाच्या मागे धावत आहेत. विमानात प्रवेश मिळावा म्हणून जीवाचा आकंत करत आहेत. मात्र या फोटोने विमानातील परिस्थिती देखील किती गंभीर आहे हे अधिक स्पष्टपणे दर्शवलं आहे. 


जो बायडन यांची पहिली प्रतिक्रिया 


अफगाणिस्तानमध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्ये तालिबाननं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि त्यानंतर या देशातून सैन्य हटवणाऱ्या अमेरिकेला परिस्थितीसाठी जबाबदार ठरवण्यात आलं. अनेकांनीच अमेरिकेच्या या निर्णयावर तीव्र नाराजीही व्यक्त केली. जागतिक स्तरावर होणारा विरोध आणि विश्वासघात केल्याचं म्हणत होणारे आरोप पाहता राष्ट्राध्यक्ष जो बायडन (US president joe biden) यांनी मंगळवारी अखेर या मुद्द्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली.


अफगाणिस्तान (Afganistan Crisis) संकटावर संबोधित करताना त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे ठामपणे मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. अमेरिकेचं सैन्य अफगाणिस्तानमधून मागे घेण्याच्या आपल्या निर्णयावर ते ठाम दिसले शिवाय त्यांनी या निर्णयाला दुरोजाराही दिला. अमेरिकेनं या प्रकरणामध्ये बरीच तडजोड केली आणि ज्याचा परिणाम आता देशाच्या संसाधनानंवर दिसून येत असल्याचं बायडन म्हणाले.