मुंबई : Withdraw PF money sitting at home : तुम्हाला तात्काळ पैशाची गरज आहे का? असेल तर तुम्ही घरात बसून आपल्या PF खात्यातून त्वरित रोख रक्कम काढ शकता. आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगत आहोत ज्याद्वारे तुम्ही घरातून कुठेही न जाता सहज पैसे काढू शकाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचा पीएफ कापला गेला असेल आणि तुम्हाला पैशांची खूप गरज असेल तर तुम्ही तिथून काही पैसे काढू शकता. याचा फायदा असा आहे की तुम्हाला कोठूनही कर्ज घ्यावे लागणार नाही आणि कोणाकडूनही कर्ज मागावे लागणार नाही. उमंग अ‍ॅपद्वारे तुम्ही घरबसल्या तुमच्या पीएफचे पैसे सहज काढू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. हे कसे करायचे ते आम्ही येथे सांगत आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला या अ‍ॅपची माहितीही सांगत आहोत. चला जाणून घेऊया. (How To Withdraw PF Online)


Umang वापरुन ईपीएफ कसे काढायचे:


1: उमंग अ‍ॅप (Umang)डाऊनलोड करा.
2: शोध मेनूवर जा आणि EPFO ​​शोधा.
3: 'कर्मचारी केंद्रित' निवडा, 'रेझ क्लेम' वर क्लिक करा आणि EPF UAN क्रमांक प्रविष्ट करा.
4: तुमच्या फोन नंबरवर पाठवलेला OTP एंटर करा, पैसे काढण्याचा प्रकार निवडा आणि UMANG द्वारे सबमिट करा.
5: तुम्हाला दावा संदर्भ क्रमांक पाठवला जाईल आणि तुम्ही तुमच्या दाव्याच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी त्याचा वापर करु शकता.
या ई-गव्हर्नन्स पोर्टलद्वारे ईपीएफचा दावा करण्यासाठी, आधी या गोष्टी असणे आवश्यक आहे. स्वीकारलेले आणि सत्यापित केवायसी तपशील, आधार लिंक केलेला UAN नंबर, UMANG अ‍ॅप आधार लिंक केलेला आणि आधारशी लिंक केलेला फोन नंबर आवश्यक आहे.


Umangची वैशिष्ट्ये आणि फायदे :


त्रासातून सुटका : UMANG अ‍ॅपसह, यूजर्स  Aadhaar, DigiLocker  आणि PayGov सह सर्व सरकारी सेवांसह येथे लाभ घेऊ शकतात. तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्रे कोठे आहेत ते देखील तपासू शकता आणि अपॉइंटमेंट बुक करु शकता.


सहज प्रवेश : हे ई-गव्हर्नन्स अ‍ॅप केवळ स्मार्टफोनपुरते मर्यादित नाही. तुम्ही ते डेस्कटॉप, टॅबलेट किंवा एसएमएसद्वारेही वापरु शकता.


ग्राहक सेवा: UMANG कडे एक समर्पित ग्राहक समर्थन संघ आहे जो यूजर्सला येणाऱ्या सर्व समस्या सोडवतो. सपोर्ट टीम आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत उपलब्ध असते.


सर्व सेवांसाठी एकच अ‍ॅप : उमंग अ‍ॅपची (UMANG) सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 100 हून अधिक सरकारी सेवांसाठी एकच प्लॅटफॉर्म आहे. वापरकर्ते विविध चॅनेलच्या श्रेणीचा वापर करून एकात्मिक प्लॅटफॉर्मवर एकाधिक सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील.