नवी दिल्ली : पंजाब घोटाळ्याचा सूत्रधार आणि हिरा व्यावसायिक नीरव मोदी आणि त्याच्या कुटुंबीयांना फसवणूक प्रकरणात चौकशीत सहभागी होण्यासाठी प्रवर्तन संचलनालयाद्वारे (ईडी)  समन्स जारी करण्यात आलेत. त्याला कानाडोळा करत नीरव मोदी अजूनही परदेशात आसरा शोधतोय... आणि अजूनही तो चौकशी अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला नाही. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदी सध्या सिंगापूरच्या पासपोर्टवर लंडनमध्ये राहतोय... तर त्याचा भाऊ निशाल मोदी बेल्जियमच्या पासपोर्टवर एन्टवर्पमध्ये आहे. नीरवची बहिण पूर्वी मेहता बेल्जियम पासपोर्टवर सध्या हाँगकाँगमध्ये असू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्वीचा पती मयांक मेहता याच्याजवळ ब्रिटिश पासपोर्ट आहे आणि सध्या तो हाँगकाँग आणि न्यूयॉर्कमध्ये ये-जा करतो. 


ईडीननं नीरव मोदीचे वडील दीपक मोदी, बहिण पूर्वी मेहता आणि तिचा पती मयांक मेहता याच्याविरुद्ध समन्स जारी केलेत.  त्यांना ई-मेलद्वारे समन्स धाडण्यात आल्याचीही माहितीही ईडीच्या सूत्रांनी दिलीय. 


ईडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरव मोदीच्या नातेवाईकांना या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच समन्स धाडण्यात आले होते... आणि त्यांना १३ हजार करोड रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी उपस्थित राहण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता... त्यावर कोणतंच उत्तर न मिळाल्यानं तिघांना यापुढेही समन्स धाडण्यात येणार आहेत.