मुंबई : मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट -2021' (National Eligibility Cum Entrance Test) च्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. 12 सप्टेंबर 2021 ला संपूर्ण देशात 'नीट' परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज उद्या संध्याकाळी 5 वाजल्यापासून ntaneet.nic.in वर उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.



मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिलेल्या महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सच्या पात्रतेसाठी नीट परीक्षा घेतली जाते. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. नीट परीक्षा देशभरातील 198 शहरातील 3862 केंद्रावर होणार आहे. कोव्हिडचे सर्व निर्बंध पाळून परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे.  नीटसाठी अर्ज मिळताच नवीन परीक्षेचा पॅटर्नही जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे.