NEET Exam 2018 : लवकरच येणार ऑनलाईन फॉर्म
नॅशनल एलिजबिलटी एंट्रंस टेस्ट (एनईईटी, नीट) २०१८ चे ऑनलाईन फॉर्म लवकरच उपलब्ध होणार आहेत. सीबीएसई याच्या तयारीत आहे.
नवी दिल्ली : नॅशनल एलिजबिलटी एंट्रंस टेस्ट (एनईईटी, नीट) २०१८ चे ऑनलाईन फॉर्म लवकरच उपलब्ध होणार आहेत. सीबीएसई याच्या तयारीत आहे. एमबीबीएस आणि बीडीएसमध्ये एडमिशनसाठी 'सीबीएसई' नीट परीक्षा घेत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आयुष कोर्ससाठीही नीटप्रमाणेच टेस्ट घेतली जाणार आहे.
याआधी आल्या तारखा
नीट २०१८ ऑनलाईन फॉर्म केव्हा येणार यासंदर्भात आधीही तारखांच्या आफवा आल्या होत्या. याआधी ३१ जानेवारी ही तारीख सांगितली गेली होती.
cbseneet.nic.in आणि cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटवर घोषणा होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार फॉर्मची तारीख या आठवड्यातच घोषित होणार आहे.
नीट परीक्षा ६ मे २०१८ ला
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन फॉर्मचे नोटीफिकेशन जारी होण्यासाठी काही अडचणी आहेत. अधिकाऱ्यांना यासंदर्भात विचारल्यास ते वेबसाईट पाहण्याचा सल्ला देतात.
नीट परीक्षा ६ मे २०१८ ला होणार आहे. तुर्तास परिक्षार्थींना वाट पाहावी लागणार आहे. एका अधिकृत नोटीफिकेशनद्वारे यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.