मुंबई: मेडिकलसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते. नुकतीच नीट परीक्षा 12 सप्टेंबर रोजी घेण्यात आली आहे. त्याचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. मात्र निकाल लागण्यापूर्वी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आता अजून एक फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी टाळाटाळ केल्यास विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलमध्ये करियर करायचं आहे त्यांचं स्वप्न अपूर्ण राहू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यार्थ्यांसाठी आता पुन्हा एकदा नीट रजिस्ट्रेशन विंडो सुरू कऱण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्याआधी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामध्ये विद्यार्थ्य़ां पुन्हा एकदा डिटेल्स द्यावे लागणार आहे. हा फॉर्म लवकर भरणं आवश्यक आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. जर विद्य़ार्थ्याने हा फॉर्म भरला नाही तर त्याने दिलेल्या परीक्षेचा निकाल लागणार नाही. त्याचा निकाल रद्द करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला हा फॉर्म भरणं आवश्यक आहे. 


कसा भरायचा हा फॉर्म
विद्यार्थ्यांना दोन्ही टप्प्यात फॉर्म भरायचा आहे. यासाठी त्यांना नीटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. ntaneet.nic.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे. तिथे रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. याचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेलं नाही पण लवकरच सुरू कऱण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. 



विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तिथे त्यांना जेवढी माहिती आधी रजिस्टर करताना भरली होती. तशीच पुन्हा एकदा भरायची आहे. विद्यार्थ्याची माहिती, शैक्षणिक माहिती यामध्ये दहावी आणि अकरावीची तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे. याशिवाय इतर माहिती, आई-वडिलांची माहिती अशी सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिटचा पर्याय निवडायचा आहे. 


दोन्ही फेजमध्ये जर तुम्ही ही माहिती भरली नाही तर तुमचा निकाल येणार नाही. तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकलं आहे. त्यामुळे तुम्ही जर नीट परीक्षा दिली असेल तर हा फॉर्म भरायला विसरू नका.