मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा पर्याय समोर आला आहे. परंतु भारतात लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर लसींचा अभावामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. त्यात लसीकरणा संबंधीत वेगवेगळ्या अफवा यायल्या सुरवात झाल्या, कोणी ही लस घ्यावी आणि कोणी ही लस घेऊ नये? तसेच ही लस कशी घ्यावी यातच लोकांचा संभ्रम उडू लागला. त्यात गरोदर स्त्रिया किंवा स्तनपान करण्याऱ्या स्त्रियांनी ही लस घ्यावी की नाही? असा प्रश्नही लोकांना पडला होता, आता त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना लसीकरणा संबंधीत काही महत्वाचे निर्णय बदलण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विचार केला आहे. यामध्ये हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, आता ज्या स्त्रिया आपल्या लहान मुलांना स्तनपान देतात त्यांनाही कोरोनाची लस मिळू शकते.


नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड  ने (NEGVAC) लसीकरणाशी संबंधीत काही गोष्टींवर सूचना दिल्या होत्या, ज्यावर आता आरोग्य मंत्रालयाची ही मान्यता मिळाली आहे.


NEGVAC च्या या सूचना जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहून देण्यात आल्या आहेत, ज्याला आता आरोग्य मंत्रालयानेही मान्यता दिली आहे.


कोरोना लसीशी संबंधित या नवीन मार्गदर्शक सूचना खूप महत्त्वपूर्ण आहेत. कारण पहिल्या डोस घेतल्यानंतर कोरोना झाला तर?, लस कधी आणि कशी घ्यावी किंवा कोरोना झाल्यावर रक्तदान कधी करावे याबद्दल लोकांमध्ये संभ्रम होता.


कोरोना लसीकरणासाठी NEGVAC च्या या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयातून ग्रीन सिग्नल


1. कोरोनापासून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत कोरोना लसीकरण पुढे ढकलले जाऊ शकते. ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना तीन महिन्यांनंतर कोरोनाची लस दिली जाऊ शकते.
2. पहिली कोरोना लसी घेतल्यानंतर जर कोरोना संक्रमण झाला असेल तर, त्या व्यक्तीचा दुसरा डोस 3 महिन्यांपर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो. म्हणजेच 3 महिन्यानंतर कोरोनाचा दुसरा डोस घेऊ शकता.
3. स्तनपान करणाऱ्या महिला कोणतीही भीती मनात न बाळगता कोरोना लस घेऊ शकतात.
4. कोविड लसीकरणापूर्वी  रॅपिड ऍटीजन टेस्टची आवश्यकता नाही.
5.उपचारादरम्यान प्लाझ्मा थेरपी देण्यात आलेल्या कोरोना संक्रमित रूग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 3 महिन्यांनी ही लस मिळेल.
6. इतर गंभीर आजार असलेले रुग्ण किंवा ज्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले अशा रुग्णांना लस घेण्यासाठी 4 ते 8 आठवडे थांबावे लागेल.
7. कोणतीही व्यक्ती लस घेतल्यानंतर 14 दिवसांनंतरही रक्तदान करू शकते, तर कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती आरटी-पीसीआर चाचणी रीपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर 14 दिवसांनी रक्तदान करू शकतो.
8. कोविड 19 पासून गर्भवती महिलांना लसी देण्याच्या प्रस्तावावार अद्याप विचार सुरु आहे.