PM Modi Rajya Sabha Speech : संपूर्ण देशात अनेक राज्यांमध्ये आरक्षणाचा विषय पेटला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत नेहरुंचे नाव घेत आरक्षाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. नेहरुंचा आरक्षणाला विरोध होता असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत नेहरुंनी आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांना लिहीलेले पत्र वाचवून दाखवले.  पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचून दाखवलेल्या या पत्रावरुन राज्यसभेत गदारोळ झाला.


आरक्षणाबाबत नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी


काँग्रेस सध्या जातीपातीवरुन भाष्य करत आहे.  दलित, मागास आणि आदिवासी यांच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसला विरोध आहे. जर बाबासाहेब नसते तर SAC/ST ला आरक्षण मिळाले असते की नसते याचा मी विचार करत आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नेहरूजींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.  मला आरक्षण आवडत नाही आणि विशेषतः नोकरीत आरक्षण नकोच असा उल्लेख नेहरुंनी या पत्रात केला होता असे मोदींनी म्हंटेले आहे.