Shocking News: ग्रामीण भागात आजही कोंबड्याच्या बांगने अनेक जण उठतात आणि आपल्या कामाला लागतात. पहाटे कोंबडा आरवतो तेव्हा लोकांची उठायची वेळ होते, पण आजच्या जमान्यात लोक मोबाईलमध्ये वेळ सेट करुन झोपतात आणि त्यांना उठायचे वाटत असेल तरच उठतात. मात्र, काहीवेळा साखरझोपेत असताना आजूबाजूला येणाऱ्या आवाजांमुळे लोक त्रस्त होतात. (National News in Marathi) रागाच्या भरात ते एकतर भांडतात किंवा पोलिसांत तक्रार करण्यास भाग पाडतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात घडली. शेजारच्या कोंबड्याने जोरजोरात बांग दिली की त्याचा इतका त्रास झाला की शेजाऱ्याने पोलिसात धाव घेतली. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका डॉक्टरने आपल्या शेजाऱ्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)


कोंबड्याच्या बांगने डॉक्टर अस्वस्थ  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोंबडा आरवल्याने लोकांना सकाळी लवकर उठण्यास मदत होते. परंतु मदत होण्याऐवजी डॉक्टर त्रस्त झालेत. हे डॉक्टर शहरातील पलासिया भागात राहतात आणि शेजाऱ्याच्या कोंबड्याच्या आवाजाने ते वैतागले होते. यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम दोन्ही पक्षांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे प्रकरण न सुटल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. पलासिया पोलिस स्टेशनचे प्रभारी संजय सिंह बैंस यांनी सांगितले की, पलासिया भागातील ग्रेटर कैलाश हॉस्पिटलजवळ राहणारे डॉ. आलोक मोदी (Doctor Alok Modi) यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे.


शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार 


पोलिसांनी या घटनेबद्दल सांगितले की, 'आम्ही आधी डॉक्टर आणि त्यांच्या शेजाऱ्यांशी बोलू आणि नंतर ते सोडवण्याचा प्रयत्न करु. तरीही या प्रकरणाचे निराकरण न झाल्यास फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 133 अंतर्गत कारवाई केली जाईल. हा कायदा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर अडथळा किंवा उपद्रव निर्माण करण्यासाठी आहे. डॉ. आलोक मोदी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका महिलेने आपल्या घराजवळ अनेक कोंबडा आणि कोंबड्या पाळल्या आहेत आणि दररोज सकाळी कोंबडा बांग देत असतो. त्यामुळे खूप अस्वस्थ होते. आलोक मोदी सांगतात की, कामामुळे ते रात्री उशिरा घरी परततात आणि पहाटे कोंबड्याच्या आवाजाने जाग येते आणि झोप पुरी होत नाही. त्यामुळे अस्वस्थ होते.