Nepal Lanslide Latest News: नेपाळमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. शेजारी राष्ट्रात भूसख्खलन होऊन 2 बस एका नदीत वाहून गेल्या आहेत. या दुर्घटनेत 7 भारतीय नागरिकांचा मृत्यू झालाय. बसमध्ये असलेले 60 प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. दुर्घटनेची भीषणता पाहून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार बीरगंजहून काठमांडूला जाणारी एक बस त्रिशूली नदीतमध्ये कोसळली. यामध्ये 7 भारतीयांचा मृत्यू झालाय. रस्ते विभागाने नारायणघाट काठमांडू रस्ता 15 दिवसांसाठी बंद केला होता. पण तरीही या रस्त्यावरुन जीव धोक्यात घालून वाहतूक सुरु होती. नेपाळमध्ये जास्त पाऊस पडतो. वेगवेगळ्या ठिकाणी भूसख्यलन होतंय. यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. 


काठमांडूला जाणाऱ्या एंजेस बसमध्ये 24 प्रवासी होते तर काठमांडूहून गौर येथे जाणाऱ्या गणपति डिलक्स बसमध्ये 41 प्रवासी होते. पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी हा अपघात झाल्याचे म्हटले जाते. गणपति डिल्सक्स बसमध्ये असलेल्या 3 प्रवाशांनी उडी मारुन आपले प्राण वाचवले आहेत. 


काठमांडू पोस्टच्या चितवनच्या मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी ही माहिती दिली आहे. 



नेपाळ पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाचे जवान बचाव कार्य करण्यासाठी घटनास्थळी पोहोचल्याची माहिती पोलीस अधिक्षक भवेश रिमल यांनी दिली.


काय म्हणाले पंतप्रधान?



नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलंय. सिमल्टारमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये बस वाहून गेल्याने 5 डझन प्रवासी बेपत्ता आहेत. देशातील विविध भागातील दुर्घटनेत झालेल्या नुकसानाचे मला दु:ख आहे. मी गृह विभागासह सर्व सरकार यंत्रणांना प्रवाशांचा शोध घेण्यास आणि बचाव कार्याचे निर्देश दिल्याचे ते म्हणाले. विविध ठिकाणाही झालेल्या भूसख्खलनामुळे नारायणघाट-मुगलिंग येथे गाळ जमा झाला. यामुळे येथील वाहतुकीसाठी 4 तास लागत आहेत.