'गुलजार 'स्त्रीविरोधी', सगळ्या शिव्या...'; हनी सिंगच्या विधानाने खळबळ! नव्या वादाला फुटलं तोंड

Honey Singh On Gulzar: हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वाधिक नावाजलेले आणि सन्माननिय गितकारांपैकी एक असलेल्या गुलजार यांच्याबद्दल हनी सिंगने एका मुलाखतीत केलेल्या विधानांची सध्या जोरदार चर्चा आहे. नेमकं तो काय म्हणालाय पाहूयात...

| Sep 09, 2024, 08:59 AM IST
1/12

 gulzarhoneysingh

'आधी मी बोलत नव्हतो,' असं म्हणत हनी सिंगने त्याच्यावर होणाऱ्या टीकेला दिलेलं उत्तर सध्या चर्चेत असून नवीन वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे. हनी सिंग नेमकं काय म्हणालाय पाहूयात...

2/12

 gulzarhoneysingh

प्रसिद्ध गायक हनी सिंगने ज्येष्ठ गितकार गुलजार यांच्या लेखणीवर आक्षेप नोंदवला आहे. त्याने केलेल्या विधानामुळे वाद होम्याची शक्यता आहे.  

3/12

 gulzarhoneysingh

गुलजार यांनी लिहिलेलं 2006 साली प्रदर्शित झालेल्या 'ओंकारा' चित्रपटातील 'बिडी जलै ले' हे गाणं 'स्त्रीविरोधी' असल्याचा दावा हनी सिंगने केला आहे.  

4/12

 gulzarhoneysingh

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या रॅप गायकाने हा आक्षेप नोंदवला आहे. हनी सिंगच्या गाण्याचे शब्द हे कायमच 'आक्षेपार्ह' आणि 'स्त्रीविरोधी' असल्याची टीका होते, यावरुनच प्रश्न विचारला असता त्याने थेट गुलजार यांचं नाव घेतलं.  

5/12

 gulzarhoneysingh

हनी सिंगच्या गाण्यांमधील शब्दांवर अनेकदा आक्षेप घेतले जातात यावर बोलताना त्याने, "मी याकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र मी याला उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं. गुलजार सहाब यांनी लिहिलं आहे., 'बीड़ी जलाई ले, जिगर से पिया जिगर मा बड़ी आग है' महिलांचं जिगर (हृदय) कुठे असतं? मला हे 'स्त्रीविरोधी' वाटतं," असं म्हटलं आहे.

6/12

 gulzarhoneysingh

पुढे बोलताना गुलजार यांच्या याच गाण्याचा संदर्भ हनी सिंगने दिला. "'ज़बान पे लागा रे, नमक इश्क का' इथे ते महिलेच्या जीभेबद्दल का बोलत आहेत? फक्त मीच चुकीचा कसा?" असा प्रश्न हनी सिंगने विचारला.  

7/12

 gulzarhoneysingh

"आधी मी बोलत नव्हतो. आज मी हे बोलतोय. मी आधी उत्तरं देत नव्हतो तर लोक म्हणायचे याला सहज लक्ष्य करता येतं. आता त्यांनी याबद्दल (मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल) बोलावं," असं हनी सिंग म्हणाला आहे.   

8/12

 gulzarhoneysingh

आपल्या शब्दांमधून महिलांच्या दिसण्यावर भाष्य होतं का? महिला या एखाद्या वस्तू असल्याप्रमाणे आपल्या गाण्यांचे शब्द असतात का? याबद्दलही हनी सिंग बोलला.   

9/12

 gulzarhoneysingh

"मी महिलांना ऑब्जेक्टीफाय करत नाहीय. असं थोडी असतं. आधी कशी कशी गाणी असायची. त्यांच्याकडे मात्र गाणी म्हणून पाहिलं जायचं. मी तर चोरी के पिछे क्या हैं सारख्या वादग्रस्त गाण्यांबद्दल तर बोलतच नाहीये," असं वैतागलेला हनी सिंग म्हणाला.  

10/12

 gulzarhoneysingh

"सगळ्या शिव्या हनी सिंगलाच (मलाच) दिल्या जातात आणि इतरांना लिजंड बोललं जात आहे, असं का?" असा सवाल हनी सिंगने उपस्थित केला आहे. "आपण मॉर्डनही होतोय पण पुरतान विचारही सोडत नाहीये," असा टोला हनी सिंगने लगावला.   

11/12

 gulzarhoneysingh

हनी सिंगने ज्या 'बिडी जलै ले' गाण्यावरुन गुलजार यांच्या लेखणीवर आक्षेप घेतला आहे ते गाणं सुनिधी चौहान आणि सुखविंदर सिंग यांनी गायला होतं. या गाण्याचं चित्रिकरण बिपाशा बासूवर करण्यात आलं होतं. गाण्याला संगित विशाल भरद्वाज यांनी दिलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशालने केलं होतं. चित्रपटामध्ये अजय देवगण, करिना कपूर, सैफ अली खान, कोंकणा सेन शर्मा, विवेक ओबोरॉय आणि बिपाशा बासू प्रमुख भूमिकेमध्ये होते.  

12/12

 gulzarhoneysingh

हनी सिंगचा नुकताच ग्लोरी नावाचा अल्बम प्रकाशित झाला आहे. त्याने लॅटीन अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील काही संगीतकारांबरोबरच भारतीय स्थानिक गायकांबरोबर एकत्र येऊन अल्बम तयार केला आहे.