नवी दिल्ली : भारत-चीन या देशांमध्ये तणावाचं वातावरण सुरु असतानाच दुसरीकडे नेपाळ आणि भारताच्या सीमा प्रश्नाचा मुद्दाही साऱ्या जगाचं लक्ष वेधू लागला आहे. त्यामध्येच आता भारत- नेपाळमध्ये असणाऱ्या या तणावग्रस्त वातावरणात आणखी भर टाकणारी एक घटना घडली आहे. ज्यामध्ये सीमा भागात गोळीबार झाला असून, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिची समोर येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत- नेपाळच्या सीमा भागात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा गोळीबार झाला, ज्यामध्ये एकाचा मृत्यू, तर दोनजण जखमी झाले आहेत. येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार नेपाळच्या बाजूनं हा गोळीबार करण्यात आला. 


बिहारमध्ये असणआऱ्या भारत- नेपाळ सीमेनजीक असणाऱ्या सीतामढी येथील सोनबरसा ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेविषयी पोलिसांकडून मिळालल्या माहितीनुसार पोलिसांचं शस्त्र हिसकावून घेत पळ काढणाऱ्या दोन इसमांवर गोळीबार केल्याचं सारवासारवीचं उत्तर नेपाळच्या पोलिसांकडून देण्यात येत आहे. पण, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सीमा ओलांडण्याच्या मुद्द्यावरुन हा गोळीबार केला गेल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्यापही तपास सुरु आहे. 



 


एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार सकाळी साडेआठ वाजल्यानंतरच्या सुमारास एक कुटुंब नेपाळच्या दिशेनं जात होतं. त्यांना सीमेजवळीच चौकीवर नेपाच्या सुरक्षा रक्षकांकडून थांबवण्यात आलं. त्याचवेळी या ठिकाणी शाब्दीक बाचाबाची झाली. ज्यामध्ये नेपाळच्या पोलिसांनी गोळीबार केल्याचं म्हटलं जात आहे.