भाच्याच्या मामीवर जीव जडला, पण मामा नडला, पुढे असं घडलं
भाच्याचं प्रेम एकतर्फी नव्हतं, तर मावशीही त्याच्या प्रेमात वेडी होती.
मुंबई : विवाहबाह्य संबंधांच्या (extra marital affair) अनेक घटना दररोज समोर येत असतात. अशीच एक घटना समोर आलीय. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय. मामीच्या प्रेमात दिवाना झालेल्या भाच्याने मामाची गोळी मारुन हत्या केली. हत्येमध्ये भाच्याच्या मित्रही सहभागी होता. भाच्याचं प्रेम हे एकतर्फी नव्हतं. तर मामीलाही भाचा आवडायचा. धक्कादायक बाब म्हणजे या हत्याकांडात भाच्यासोबत मामीचाही सहभाग होता. (nephew madly loved with mami his ended to mama at uttar pradesh crime news)
भाच्याने 13 नोव्हेंबरला मित्रासोबत मामाची हत्या केली. पोलिसांनी याबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी तपासानंतर आज पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडचा खुलासा केला. मामीच्या प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने मित्राच्या मदतीने मामाचा गेम केला, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. पोलिसांनी गुन्हेगारांवर 25 हजार रुपयांचं बक्षिसही जाहीर केलं होतं. दरम्यान पोलिसांनी मामी भाच्यासह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. ही सर्व घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये घडलीय.
विद्यासागर असं मामाचं तर रवीरंजन असं नाव आहे. विद्यासागर हे अहिरोली दान गावातील रहिवाशी होते. विद्यासागर यांची 13 तारखेला हत्या करण्यात आली. पोलीस अधिक्षकांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं. घटनास्थळाची पाहणी केली. पोलीस पथक तयार केलं. घटनेचा छडा लावण्याचे आदेश दिले. पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. तिला ताब्यात घेतलं. कसून चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.
"माझं रवीवर प्रेम होतं. आम्हा दोघांना लग्न करायचं होतं. मात्र माझा नवरा विद्यासागरचं लग्नास विरोध होता. त्यानंतर मी रवीसोबत विद्यासागरला कायमचा संपवण्याचा कट रचला", अशी माहिती विद्यासागरच्या पत्नीने पोलिसांना दिली.