NEWBORN WILL GET GOLD RING : 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे(PM Narendra Modi birthday). त्याची जोरदार तयारी देशभरात सुरु आहे  ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी (PM  Modi) यांचा यंदाचा वाढदिवस म्हणजेच 17 सप्टेंबर हा दिवस देशासाठी अत्यंत खास असणार आहे. कारण, देशात खास पाहुण्यांचं आगमन होत हे. तेसुद्धा तब्बल 70 वर्षांनंतर. भारतातून नामशेष झालेली ही प्रजाती पुन्हा एकदा देशात(on pm modis birthday cheetah will brought to india )


आल्यामुळं सध्या सर्वत्र आणि विशेष म्हणजे प्राणीप्रेमींमध्ये(animal lovers) कमालीचं कुतूहल पाहायला मिळत आहे. 


 यानिमित्ताने केंद्रीय भाजप नेतृत्वापासून ते राज्यांपर्यंत विविध प्रकारच्या उत्सवांच्या घोषणा होत आहेत. दुसरीकडे, पंतप्रधानांच्या वाढदिवसाला जन्मलेल्या मुलांना सोन्याची अंगठी दिली जाणार आहे.(new born babies will get gold ring on pm narendra modi birthday) 


भाजपच्या तामिळनाडू युनिटने ही घोषणा केली आहे. यासोबतच मासे वाटण्याचेही जाहीर करण्यात आले आहे.पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त मुलांना अंगठी देण्याबरोबरच तामिळनाडू भाजपने इतर योजनांमध्ये


720 किलो मासे वाटण्याचेही जाहीर केले आहे. केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी या घोषणेबद्दल सांगितले की, आम्ही चेन्नईतील सरकारी RSRM रुग्णालयाची निवड केली


आहे जिथे पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला जन्मलेल्या सर्व मुलांना सोन्याच्या अंगठ्या दिल्या जातील.याशिवाय भाजप 15 दिवस पंतप्रधान मोदींचा वाढदिवस साजरा करणार आहे. यादरम्यान अनेक कल्याणकारी योजनांचा


विस्तार करून त्यांचा लाभ इतर वंचित लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातील.