देशाचे नवे सरन्यायाधीश न्या. दीपक मिश्रा
देशाचे विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांचा कार्यकाळ आज संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ते उद्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.
नवी दिल्ली : देशाचे विद्यमान सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांचा कार्यकाळ आज संपत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली. ते उद्या आपला पदभार स्वीकारणार आहेत.
राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्यायमूर्ती मिश्रांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू उपस्थित होते.
भारताचे ४५ वे सरन्यायाधीश असणारे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांना साहित्य आणि अध्यात्माची विशेष जाण आहे. आजवरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांचे निकाल दिले आहेत.
अयोध्येतील वादग्रस्त जागेची मालकी, कावेरी जलविवाद, सहारा समूह व सेबी यांच्यातील वाद, बीसीसीआयमधील सुधारणा, पनामा पेपर्स अशी अनेक संवेदनशील प्रकरणे त्यांना सरन्यायाधीश म्हणून आता हाताळावी लागतील. हा कार्यकाळ त्यांच्यासाठी आव्हानात्मक राहणार आहे.