मुंबई : भारतात कोरोना विषाणूची दुसरी लाट तीव्र झाली आहे. मंगळवारी 1.15 लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अधिक वेगाने पसरत असल्याचं दिसत आहे. 17 सप्टेंबर रोजी पहिल्या पहिल्या लाटेत 97,000 रुग्णांची वाढ झाली होती. जी सर्वाधिक होती. 4 एप्रिल रोजी देशात 1.03 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 एप्रिल रोजी ही संख्या 1.15 लाखांवर गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना विषाणूचा नवीन स्ट्रेन सक्रिय झाल्याने, त्याची नवीन लक्षणे देखील समोर येत आहेत. या नव्या लक्षणांमध्ये काही लक्षणं ही नवीन आहेत. 


नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, उलट्या होणे, सांधेदुखी, अशक्तपणा येणं, भूक न लागणे असे लक्षणं दिसत आहेत.


वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) च्या मते, वेगवेगळे लोकांमध्ये वेगवेगळे लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणे एखाद्या व्यक्तीस विषाणूच्या संसर्गाच्या 5-6 दिवसांनी दिसतात. काही प्रकरणांमध्ये ही लक्षणे 14 दिवसांपर्यंत देखील नोंदविली गेली आहेत.


भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, यावेळी देशातील 18 राज्यांत कोरोनाचे नवे स्ट्रेन सापडले आहेत. यामध्ये महाराष्ट्रात सापडलेल्या डबल म्यूटेंट स्ट्रेनचा ही समावेश आहे. महाराष्ट्रात रुग्ण वाढत आहेत. येथे व्हायरसमध्ये दोन बदल झाले आहेत. यामुळे त्याचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. 


नवीन प्रकरणांबाबत भारतात केलेल्या अभ्यासानुसार बदलत्या स्ट्रेनमुळे लक्षणेही बदलत आहेत. आता फक्त ताप, थकवा किंवा कोरडा खोकला, चव आणि गंध जाणे ही कोरोनाची लक्षणे राहिलेली नाहीत. 


नवीन लक्षणांमध्ये पोटात वेदना, मळमळ, उलट्या आणि सर्दी तसेच स्नायू दुखणे, लैंगिकदृष्ट्या अकार्यशील, अशक्तपणा, भूक कमी होणे यांचा समावेश आहे. ताप आणि खोकला यासारख्या सामान्य लक्षणांनंतरही टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह येत आहे.


यूके आणि इतर युरोपियन देशांमध्ये संक्रमणाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत ताप, खोकला वगळता इतर लक्षणेही दिसून आली होती.