नवी दिल्ली: येत्या निवडणुकीत मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान घेण्याची मागणी पुढे रेटण्यासाठी आज दिल्लीत सर्व विरोधीपक्षाच्या नेत्यांची बैठक होतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकूण १७ पक्षांनी याविषयी एकत्र येऊन २०१९मध्ये मतदान यंत्राची पद्धत बंद करून जुन्हा मतपत्रिकांच्या पद्धतीनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात संसदेच्या व्यासपीठावर चर्चा करण्याची मागणी करण्याचा काही विरोधी पक्षांचा विचार आहे. यासंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी आज भाजपाविरोधकांच्या बैठकीत चर्चा होणार आहे.