सुपरबाईकसोबत रेसिंग करणा-या २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू
वाहतूकीच्या रस्त्यांवर बाईक रेसिंग कशाप्रकारे जीवावर बेतू शकते, याची अनेक उदाहरणं याआधी बघण्यात आली आहेत. आता पुन्हा एकदा एका २४ वर्षीय तरूणाला हायस्पीड सुपरबाईकसोबत रेसिंग लावणे जीवावर बेतले आहे.
नवी दिल्ली : वाहतूकीच्या रस्त्यांवर बाईक रेसिंग कशाप्रकारे जीवावर बेतू शकते, याची अनेक उदाहरणं याआधी बघण्यात आली आहेत. आता पुन्हा एकदा एका २४ वर्षीय तरूणाला हायस्पीड सुपरबाईकसोबत रेसिंग लावणे जीवावर बेतले आहे.
दिल्लीतील हिमांशु बंसल अस मृत मुलाचं नाव आहे. सोमवारी सायंकाळी हिमांशु आणि त्याचे दोन मित्र पार्टी झाल्यावर ऎकमेकात रेस लावत होते. मंडी हाऊस येथे पोहोचताच हिमांशुचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि रस्त्यावरील डिव्हायडरवर जाऊन तो आदळला. बाईकचा स्पीड खूप जास्त असल्याने तो कंट्रोल करू शकला नाही आणि त्यामुळे या घटनेत त्याला आपला जीव गमवावा लागला.
महत्वाची गोष्ट म्हणजे हिमांशुने हेलमेट घातले होते आणि त्या हेलमेटची तुकडे पडले आहेत. बाईक आणि हेलमेटच्या स्थितीवरून त्याच्या बाईकचा स्पीड किती असेल याचा अंदाज लावता येतो.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमांशु बेनेली टीएनटी ६०० आय या बाईक सोबत रेस लावत होता. ही एक सुपरबाईक असून काही सेकंदात २०० किमी प्रतितासाच्या गतीने धावते. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
हिमांशु हा बाईक चालवत असताना अचानल समोर आलेल्या एका वॄद्धाला धक्का लागला आणि त्यामुळे हिमांशुचं बाईकवरील नियंत्रण सुटलं. यात वृद्धाला किरकोळ जखम झाली आहे. हा सगळा प्रकार त्याच्या मित्राच्या हेलमेटला लागलेल्या कॅमेरात कैद झाल्याचे पोलिसांनी सांगितले.