मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन रखडण्याची चिन्ह असताना देशात आणखी चार नव्या मार्गांवर बुलेट ट्रेनसाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वे मंत्रालयानं दिल्ली-मुंबई, दिल्ली-कोलकाता, मुंबई-चेन्नई आणि मुंबई-नागपूर मार्गावर बुलेट ट्रेन चालवण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे. देशातल्या सर्वात बिझी असलेल्या या मार्गांवर ही चाचपणी करण्यात येणार आहे. यासाठीच्या अभ्यास करण्यासाठी सल्लागार समितीची स्थापना केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मार्गांवरच्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचा खर्च, जमीन यासाठी आढावा घेणं सुरुय. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार करता यासाठी काही कालावधी जाणारय. मुंबई अहमदाबाद प्रकल्प २०२३ च्या सुमाराला कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. 


मात्र सद्यपरिस्थितीत नव्या सरकारकडून या प्रकल्पापेक्षा इतर महत्त्वाच्या बाबीना प्राध्यान्यक्रम असल्यानं २०२३ ची डेडलाईन बदलू शकतेय.