नौदलाच्या ताफ्यात आयएनएस विक्रांत, जाणून घ्या वैशिष्ट्यं
भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत (ins vikrant) ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे.
मुंबई : भारतीय नौदलासाठी (Indian Navy) 2 सप्टेंबर ऐतिहासिक दिवस असणार आहे. भारतीय नौदलाच्या ताफ्यात संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत (ins vikrant) ही विमानवाहू युद्धनौका दाखल होत आहे. चीनसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातोय. ( new ins vikrant will join navy on 2 september more than 2200 compartments know other features)
हिंदी महासागरात चीनच्या कुरापती वाढत असताना भारताच्या ताफ्यात आता दुसरी विमानवाहू युद्धनौका दाखल होतीय. जिचं नाव आहे INS विक्रांत...ही संपूर्ण भारतीय बनावटीची युद्धनौका असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नौसेनेला ती सुपूर्द करतील. INS विक्रांतमुळे हिंदी महासागरात कुरापती करणा-या चीनला चांगलाच चाप बसणारंय.
INS विक्रांतची वैशिट्ये
INS विक्रांतची लांबी 262 मीटर तर रूंदी 62 मीटर असून उंची 59 मीटर आहे. विक्रांतचा टॉप स्पीड 28 नॉट्स म्हणजेच 52 कि.मी. प्रतितास इतका आहे..तिची मालावाहू क्षमता 40 हजार टन इतकी आहे.
INS विक्रांतवर एकाच वेळी 30 एअरक्राफ्ट राहू शकतात. त्यात 29 के ही लढाऊ विमानं आणि कामोव्ह 31 ही हेलिकॉप्टर तैनात असतील. या युद्धनौकेवर जवळपास 2300 कंपार्टमेंट असून तिथं1449 नौसैनिक आणि 196 ऑफिसर राहू शकतील. INS विक्रांतसाठी जवळपास 23 हजार कोटींचा खर्च आलाय.
हिंदी महासागरात चीन सातत्यानं मखलाशी करत असतो. मात्र भारतही आता INS विक्रांतच्या माध्यमातून चीनला जशास तसं उत्तर देईल. संपूर्ण देशी बनावटीची ही युद्धनौका चीनची झोप उडवणार यात शंका नाही.