मुंबई : केंद्र सरकार देशातील रेल्वेला आधुनिक रुप देण्याच्या तयारीत आहे. याबाबतीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तिरुपती स्टेशनच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून असं वाटतं आहे की, जसं हे एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे. पीयूष गोयल यांनी देखील हे फोटो ट्विट करत म्हटलं आहे की, हे स्टेशन आहे की फाईव्ह स्टार हॉटेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पीयूष गोयल यांनी ट्विट करत म्हटलं की, 'रेलवे स्टेशन आह की 5-स्टार हॉटेल? बालाजी मंदिरला जाणाऱ्या भक्तांसाठी' अतिथी' म्हणून एक सरप्राइज आहे. तिरुपती स्टेशन लवकरच एका प्रिमियम लॉजचं उद्घाटन करणार आहे.' पीयूष गोयल यांनी या प्रिमियम लॉजचे ३ फोटो शेअर केले आहेत.



याआधी सरकारने रेल्वे स्टेशनवर आकर्षक पेंटिंग्स केल्या होत्या. हे पेंटिंग स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत बनवण्यात आली होती. सरकारने स्टेशन आणि रेल्वे गाड्या स्वच्छ ठेवण्यासाठी जोर दिला होता. सरकारने गुगलसोबत ही एक करार करत स्टेशनवर अर्ध्या तासासाठी हायस्पीड इंटरनेट मोफत सेवा सुरु केली आहे. आता या अलिशान लॉजमुळे रेल्वे प्रवाशांना आणखी एक गिफ्ट मिळणार आहे. लवकरच देशात इतर स्थानकांवर देखील असे लॉज तयार करण्यात येणार आहेत.


आता रेल्वे प्रवाशांसाठी विमानासोबत तिकीट बुक करण्याचा देखील पर्याय असणार आहे. नव्या योजनेनुसार विमान तिकीट बुक केल्यानंतर रेल्वे तिकीट देखील बुक होणार आहे. बुकींग करताना कोणत्या बोगीमध्ये कोणती सीट खाली आहे हे देखील तुम्हाला दिसेल.



रेल्वे स्थानकांवर काही व्यवस्था बदलणार आहेत. ज्यामुळे रेल्वे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठीचा वेळ वाढ शकतो. या व्यवस्थेचे सुरुवात इलाहाबाद रेल्वे स्टेशनपासून होणार आहे. जेथे कुंभ मेळ्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. त्यानंतर कर्नाटकच्या हुबळी रेल्वे स्टेशनवर देखील नवी व्यवस्था लागू होणार आहे.