पॅकेजिंगसाठी 1 जानेवारी 2023 पासून नवे नियम लागू, काय बदल होणार जाणून घ्या
New Packaging Rules: नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॅकेजिंगबाबत नवे नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता 19 पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती देणं अनिवार्य असणार आहे.
New Packaging Rules: नवं वर्ष सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. नव्या वर्षाचं नव्या संकल्पासह स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. नव्या वर्षात म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून पॅकेजिंगबाबत नवे नियम लागू होणार आहे. नव्या नियमानुसार आता 19 पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती देणं अनिवार्य असणार आहे. दूध, चहा, बिस्किट, खाद्य तेल, पीठ, बाटलीबंद पाणी, बेबी फूड, डाळ आणि धान्य, सीमेंट बॅग, ब्रेड आणि डिटर्जंटसारख्या पदार्थांच्या पॅकिंगवर पूर्ण माहिती द्यावी लागेल. जर सामान आयत केलं असेल तर प्रोडक्टवर मॅन्युफॅक्चरिंग डेट, उत्पादक देशाचं नाव लिहिणं अनिवार्य असणारर आहे.
मंत्रालयाकडून अधिसूचना जारी
मंत्रालयाने पॅकेजिंगच्या नवीन नियमाबाबत अधिसूचना जारी केली आहे. या नियमाची अमलबजावणी करण्यासाठी कंपन्यांकडे एक महिन्याचा अवधी आहे. यापूर्वी हा नियम 1 डिसेंबरपासून लागू होणार होता. मात्र आता एक महिना वाढवल्याने 1 जानेवारीपासून नियम लागू होणार आहे. जर पॅकेज केलेल्या वस्तूचे वजन प्रमाणापेक्षा कमी असेल, तर प्रति ग्रॅम किंवा प्रति मिलीलीटर किंमत देखील लिहावी लागेल. पॅकेजिंगचे नवीन नियम एका पॅकेटमध्ये 1 किलोपेक्षा जास्त माल असल्यास त्याची किंमत 1 किलो किंवा 1 लिटरनुसार लिहिणे आवश्यक करण्यात आले आहे.
कंपन्या असं करू शकतात
सरकारने उत्पादनाचे मानक पॅकिंग असावे, असे सांगितले आहे. पण कंपन्या किमती आकर्षक करण्यासाठी कमी वजनाचे पॅकेट बाजारात आणतात. या नियमांनंतर कंपन्यांना पूर्ण स्वातंत्र्य असेल. कंपन्या बाजारात विकत असलेल्या पॅकेज केलेल्या वस्तूंचे प्रमाण ठरवू शकतील. एखाद्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग तारीख त्या उत्पादनाची तारीख दर्शवते. म्हणजेच ती वस्तू त्या दिवशी पॅक केली.
बातमी वाचा- Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral
मॅन्युफॅक्चरिंग डेटचे फायदे
उत्पादनाच्या पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग डेट लिहिल्यामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही. दुकानदार खूप जुनी वस्तू विकत असेल तर उत्पादनाची तारीख पाहून तुम्ही फसवणूक टाळू शकता.