देशाला हादरवणारी बातमी! लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक, दोन अज्ञात संसदेत घुसले
Loksabha : आताची मोठी बातमी सामो आली आहे. लोकसभेच्या सुरक्षेत मोठी चूक झाली असून संसदेत एक अज्ञात व्यक्ती शिरल्याने खेळबळ उडाली.
Man Jumped in Lok Sabha : देशाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. लोकसभाचं (Loksabha Session) कामकाज सुरु असताना दोन अज्ञातांनी संसदेत उडी मारली. त्यांच्या हातात काहीतरी सामान होतं. अज्ञात व्यक्तीने खासदार बसत असलेल्या बेंचवरुन उड्या मारत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि खासदारांनी मिळून या व्यक्तीला पकडलं आणि पोलिसांकडे सोपवलं. या घटनेनंतर लोकसबेची कार्यवाही स्थगित करण्यात आली. संसदेवर हल्ला झाल्याच्या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत आणि आजच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
सभागृहाचे सदस्य नसताना तीन अज्ञात व्यक्ती संसदेत घुसरल्याने संसदेच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आला आहे.दोन आरोपींना अटक करण्यात आलं असू यापैकी एकाच नाव सागर असल्याचं समजतंय. दोन्ही आरोपींना संसद मार्ग पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलं. कोणत्या उद्देशाने हे दोन आरोपी संसे घुसले याचा पोलीस तपास करत आहेत.
एका आरोपीच्या हातात स्मोक गन
या घटनेने विरोधी पक्षातील खासदारांनी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी लोकसभेत नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली. साधारण 20 वर्षांचे दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून संसदेत उढील मारली. त्यातल्या एकाच्या हातात स्मोकगन होती. या स्मोकगन होती. यातून पिवळा धुर निघत होता. यातला एक तरुण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि काहीतरी घोषणाबाजी करत होता. हा धुर विषारी होता का याबात अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.
संसदेत उडी मारणार तरुण कोण?
संसदेत उडी मारणाऱ्या तरुणाने प्रेक्षक गॅलरीतून संसदेक उडी मारली. त्या तरुणाचं नाव सागर असं आहे. मैसूरचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावावर तो संसदेत घुसला होता.
आरोपींपैकी एक महाराष्ट्रातला
धक्कादायक म्हणजे लोकसभेच्या बाहेरही एक तरुण आणि एका तरुणीने घोषणाबाजी केली. दोघांनाही अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव अमोल शिंदे असं आहे. अमोल शिंदे 25 वर्षांचा असून तो महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. अटक करण्यात आलेल्या मुलीचं नाव निलम असं आहे ही हिसारमधली राहाणारी असून तीचं वय 42 आहे.