रायपूर : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं १६ ऑगस्टला निधन झालं. यानंतर आता वाजपेयींची आठवण म्हणून छत्तीसगडच्या नवीन रायपूर शहराचं नाव 'अटल नगर' होणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर याची माहिती दिली. अटल नगरमध्ये वाजपेयींची मूर्ती ठेवण्यात येईल. तसंच तिथल्या सेंट्रल पार्कचं नामकरणही वाजपेयींच्याच नावावर करण्यात येणार आहे. अटल नगर आणि छत्तीसगडच्या सगळ्या २७ जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटल बिहारी वाजपेयींची प्रतिमा लावण्यात येणार आहे.


रमणसिंग यांच्या आणखी घोषणा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- विलासपूर विश्वविद्यालय आणि राजनांदगाव मेडिकल कॉलेजचं नामांतर अटल बिहारी वाजपेयींच्या नावावरून


- राष्ट्रीय कवींसाठी अटल बिहारी वाजपेयींच्या नावावरून राष्ट्रीय पुरस्कार


- छत्तीसगड सरकारच्या विकास यात्रेला अटल विकास यात्रा असं नाव


- मडवा ताप वीज संयत्र आणि रायपूरमध्ये बनवण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस वे कलेक्टोरेट बागेला वाजपेयींचं नाव


- छत्तीसगड राज्य स्थापना दिनाच्या दिवशी १ नोव्हेंबरला त्रिस्तरीय पंचायत आणि नगर पालिकांना अटल बिहारी वाजपेयी सुशासन पुरस्कार


- छत्तीसगड बोर्डाच्या पाठ्यपुस्तकात वाजपेयींचं जीवन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी


- वाजपेयींनी पोखरणमध्ये ऐतिहासिक परमाणू परीक्षण केलं म्हणून छत्तीसगड सशस्त्र बलच्या एका बटालियनचं नाव पोखरण बटालियन होणार