नवी दिल्ली : जर तुम्ही आयसीआयसीआय किंवा एसबीआयचे ग्राहक असाल तर एव्हाना तुम्हाला एक मेसेज आला असेल. ३० सप्टेंबरपासून इंटरनॅशन व्यवहाराची सेवा बंद केली जाणार असल्याचे यात सांगण्यात आलंय. पण यामुळे चिंता करण्याची गरज नाही. हे तुमच्या सुरक्षेसाठी केलं गेलंय. डेबिट आणि क्रेडीट कार्डमधील वाढते घोटाळे रोखण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतलाय. जोपर्यंत ग्राहक स्वत: हून मागणी करत नाहीत तोपर्यंत बॅंकानी आंतरराष्ट्रीय डेबिट अथवा क्रेडीट कार्ड सुविधा देऊ नये असे निर्देश आरबीआयने दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याव्यतिरिक्त अनेक बदल ३० सप्टेंबरपासून डेबिट आणि क्रेडीट कार्डमध्ये झाले आहेत. यामुळे तुमच्या कार्डवर तुमचे नियंत्रण असेल आणि धोक्याच प्रमाण कमी होईल. 


काय झाले बदल ? 


डेबिट अथवा क्रेडीट कार्डचा उपयोग पॉईंट ऑफ सेलमधून पेमेंटसाठी किंवा एटीएममधून पैसे काढण्यासाठी होऊ शकतो. हा बदल सध्याची कार्ड, नवी कार्ड किंवा कार्ड रिन्यू केल्यावर लागू होईल. 


नव्या कार्ड्सचा उपयोग पीओएस किंवा एटीएममध्येचकेला जाईल. याशिवाय तुम्ही जर ऑनलाईन, कॉन्टॅक्टलेस किंवा इंटरनॅशनल व्यवहार करु इच्छित असाल तर तुम्हाला ही सेवा मॅन्युअली करावी लागणार आहे. या सेवा तुम्ही मोबाईल एप किंवा नेटबॅंकीगच्या माध्यमातून सुरु करु शकता. याशिवाय एटीएम किंवा बॅंक ब्रांचमध्ये जाऊन ही सेवा सुरु केली जाऊ शकते. 


जुन्या किंवा सध्याच्या डेबिट किंवा क्रेडीट कार्डमध्ये ऑनलाईन, कॉन्टॅक्टलेस आणि इंटरनॅशनल सेवांचा वापर केला नव्हता किंवा ती बंद ठेवली होती, त्या सेवा बंद होणार आहेत. रिन्यू केलेलं कार्ड किंवा नव्या कार्डमध्ये ही सेवा द्यायची की नाही हा निर्णय बॅंक घेऊ शकते. 



डेबिट-क्रेडिट कार्ड सेवा अशी सुरु करा


सर्वात आधी आपल्याला मोबाइल किंवा नेटबँकिंगद्वारे आपल्या बँक खात्यात लॉग इन करावे लागेल.


मग कार्ड विभागात जाऊन कार्ड मॅनेज हे ऑप्शन निवडा.


देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे दोन पर्याय मिळतील


तुम्हाला योग्य वाटेल तो पर्याय निवडा 


व्यवहार बंद करायचा असेल तर तो ऑफ करा आणि सुरू ठेवायचा असेल तर ऑन करा 


तुम्ही व्यवहाराची सीमा ठरवू इच्छित असाल तर तसे करण्याचा पर्याय आहे.