नवी दिल्ली :आता तुम्ही ट्रॅफिकचे नियम मोडले तर, 15 दिवसांच्या आत तुम्हाला नोटीस मिळेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने  याबाबत नियम जारी केले आहे. मंत्रालयातर्फे जारी नोटीफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, स्टेट इन्फोर्समेंट एजेन्सी आणि ट्रॅफिक नियमांच्या उल्लंघनाशी जोडलेल्या प्रकराणांबाबत 15  दिवसांच्या आत गुन्हा करणाऱ्याला/नियम मोडणाऱ्याला नोटीस पाठवणे बंधनकारक राहिल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रानिक पद्धतीने ट्रॅ्फिक कंन्ट्रोल आणि रस्ता सुरक्षेसाठी मोटार व्हेहिकल ऍक्ट 1989 अंतर्गत नोटीफिकेशन जारी केले आहे. विशेष म्हणजे चलन तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिवाइसेसचा वापर करण्यात येणार आहे.


मंत्रालयाने याबाबत एक ट्वीट केले आहे. त्यात म्हटले आहे की,  नियम तोडण्याची नोटीस घटना घडल्यापासून 15 दिवसांच्या आत पाठवली जाईल. तसेच इलेक्ट्रानिक मॉनिटरिंगच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड चलन भरेपर्यंत जपून ठेवण्यात येईल.