दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीने केली हद्दपार, `त्या` कृत्याचा Video Viral
Delhi Metro Viral VIDEO : गेल्या काही महिन्यात दिल्ली मेट्रो ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. या मेट्रोमध्ये रोज काही ना काही अतरंगी प्रकार पाहायला मिळतो. अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Delhi Metro Viral VIDEO News in Marathi : मेट्रोत (Delhi Metro) प्रवास करताना प्रवासी बड्या हवशीने व्हिडीओ आणि रिल्स बनवताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून मेट्रोमध्ये बरंच काय काय घडतयं, कोणी बिकिनी घालून फिरतात, कोणी थेट कपडे काढून अंघोळ करतेय, कोणी चिली स्प्रे मारून हाणामारी करतात, कोणी रोमँटिक डान्स करतात, हे सर्व कमी होतं नाही तोपर्यंत आता आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क ट्रेनमध्ये केस स्ट्रेटनींग करण्यास सुरुवात केली आहे. एका व्यक्तीने आपल्या फोनमध्ये तरुणीचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमध्ये (Delhi Metro Viral VIDEO) दररोज कोणत्या ना कोणत्या घटना घडतात. दिल्ली मेट्रोमध्ये घडलेली ही घटना सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून प्रवाशांना नेहमी माहिती दिली जाते. मात्र काही परप्रांतीय निर्लज्ज कृत्ये करून हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करतात. आताही एका तरुणीने मेट्रोत केस स्ट्रेटनींग करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी मेट्रो ट्रेनमध्ये आपले केस विंचरत असताना दिसत आहे. घरी वेळ न मिळाल्याने तरुणी थेट मेट्रोमध्ये हेअर स्ट्रेटनर घेऊन आली आहे. मेट्रोमध्ये असलेल्या इलेक्ट्रीक प्लगला तिने हेअर स्ट्रेटनर लावला आहे. तरुणी ट्रेनमध्ये उभी राहून स्ट्रेटनींग करतेय. तिची ही करामत पाहून मेट्रोमधील इतर प्रवासी चकित झालेत.
तरुणीच्या या व्हिडीओवर विविध कंमेट येत असून आशिष सिंग या व्यक्तीने त्याच्या ट्विटर अकाउंटवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'बस करो रहम करो दिल्ली मेट्रो को...' आणि इतर वापरकर्ते या व्हिडिओग्राफर देखील विचित्र कमेंट करत आहेत. व्हिडिओला अवघ्या 15 सेकंदात काही मिनिटांत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. रोजच्या धावपळीच्या युगात घड्याळाच्या काट्यावर चालावं लागतं., अशातच अनेक मुलींसाठी मेकअप म्हणजे जीव की प्राण होतो. त्यामुळे काही मुली ऑफीसला निघताना ट्रेनमध्ये केस विंचरतात किंवा मेकअप करतात, अशातच या तरुणीने हे सगळ सोडून थेट केस स्ट्रेटनींग केले आहे.