नवी दिल्ली : १ एप्रिलपासून कर्मचार्‍यांसाठी नवीन वेतन संहिता (New Wage Code)लागू होणार होती. पण आता ती पुढे ढकलण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वेज कोड पुढे ढकलला गेलाय. सध्या नोकरदारवर्गाच्या पगारामध्ये कोणता बदल होणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईपीएफओ (EPFO) मंडळाचे सदस्य विजय उपाध्याय (Virjesh Upadhyay) ने नए वेज कोड के स्थगित केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. नवीन वेज कोडवर अजून चर्चा सुरु आहे. निष्कर्षापर्यंत पोहोचल्यानंतर लवकरच निर्णय सांगण्यात येईल असे ते म्हणाले. 


गेल्या कित्येक दिवसांपासून नवीन वेज कोड मीडियामध्ये चर्चेत आला आहे. 1 एप्रिलपासून नवीन वेज कोड लागू होईल असा दावा केला जात होता. तथापि, सरकारने याबद्दल अधिकृतपणे माहिती दिली नाही. एकीकडे काही लोक नवीन वेज कोड लागू होत असल्याचा दावा करीत असताना, वेज कोडमध्ये व्यावहारिक त्रुटी असल्याचे काहीजण म्हणत होते. 



वेतन संहिता कायदा, 2019 लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे मुळ वेतन (Basic Salary) कंपनीच्या CTC च्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होऊ शकत नाही. अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना बेसिक सॅलरी कमी देऊन इतर भत्ता जास्त देतात. यामुळे कंपनीवरील ओझ कमी होतं. तसेच पीएफबरोबरच मासिक ग्रॅच्युइटीमध्येही (Monthly Gratuity)  योगदान वाढेल. अशा प्रकारे हातात पडणार पगार कमी होईल पण सेवानिवृत्तीची रक्कम कर्मचार्‍याला जास्त रक्कम मिळेल. पण हे वेज कोड लागू होणार नाही.