मुंबई : प्रियंका गांधींनी नागपूरमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी होतेय. त्याचबरोबर प्रियंकांनी पहिली सभा नंदुरबारमधून घ्यावी, असं पत्रही राहुल गांधींना पाठवण्यात आलंय. प्रियंका राजकारणात येणार म्हटल्यावर अनेकांनी प्रियंकांसाठी पायघड्या घातल्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रियांका गांधी आयी है, नई रोशनी छायी है'च्या घोषणा देत काँग्रेसचे कार्यकर्ते कामाला लागलेत. ११ फेब्रुवारीला प्रियंका गांधींचा लखनऊमध्ये पहिला रोड शो होणार आहे तर दुसरीकडे दिल्लीमधल्या काँग्रेस मुख्यालयाबाहेरच्या प्रियंका गांधींच्या फोटोसह पोस्टरबाजीही सुरू झालीय. पण या पोस्टरमध्ये प्रियंका गांधींबरोबर रॉबर्ट वाड्राही दिसत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोस्टरवर 'वाड्रा का क्या काम है', असा सवाल भाजपानं केलाय. वढेरा यांनी अनेक कंपन्यांकडून आडमार्गाने पैसा मिळवला. त्यांच्यासारखा 'रोडपती' 'करोडपती' कसा काय झाला, असा सवाल भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी केला केलाय. 


प्रियंका गांधींनी चक्क नागपूरमधून निवडणूक लढवावी, अशी मागणी नागपूर शहर काँग्रेसनं केलीय... तर प्रियंका गांधींनी नंदुरबारमध्ये पहिली राजकीय प्रचारसभा घ्यावी, अशी मागणीही एका पत्रामधून करण्यात आलीय.


प्रियंका गांधींच्या राजकारणात सक्रिय होण्यामुळे ग्ल्लीपासून दिल्लीपर्यंतचे काँग्रेस कार्यकर्ते उत्साहत असल्याचं चित्र आहे. आता हा उत्साह मतांमध्ये कितपत परावर्तित होतो, याची उत्सुकता आहे.