COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जगाला दिलासा देणारी बातमी समोर आलीय. फायझर बायोटेकच्या लसीला आपातकालीन वापराची परवानगी देण्यात आलीय. WHOकडून फायझरच्या लसीला मान्यता देण्यात आल्याने लसीच्या आयात आणि वितरणाचा मार्ग मोकळा झालाय. 


WHOच्या या निर्णयामुळे अनेक देशांसमोरील लसीच्या आयात आणि निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय. ब्रिटननं 8 डिसेंबरला या लसीच्या वापरासाधी सर्वात आधी परवानगी दिली होती. 


त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनिअन देशांनीही या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी दिली.. कोरोनाचा फैलाव झाल्यापासून आपातकालीन वापरासाठी परवानगी मिळालेली फायझर बायोटेक ही पहिलीच प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलीये. 



संपूर्ण जगाला कोरोना लस उपलब्ध व्हावी यासाठी हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं WHOनं म्हटलंय. 


कोरोना लसीच्या मंजुरीबाबत आज एक्सपर्ट कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकच्या लसीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. आत्पकालिन वापरासाठी दोन्ही लसींना मान्यता मिळू शकते. 


2 जानेवारीला सगळी राज्य आणि सगळ्या केंद्र शासित प्रदेशांमध्येकोरोनाच्या लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. 


सगळ्या राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये २ जानेवारीला ३ सत्रात 
ठरलेल्या ठिकाणी रंगीत तालीम घेतली जाईल. काही राज्यांमध्ये अत्यंत दुर्गम भागातील जिल्ह्याच्या ठिकाणीही लसीकरणाची रंगीत तालीम होईल


महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड केली जाणार आहे.