Surya and Chandra Grahan: नवीन वर्ष 2023 लवकरच सुरू होणार आहे. तेव्हा येत्या वर्षात अनेक मोठंमोठे इव्हेंट्स होणार आहेत. त्यातले महत्त्वाचे भौगोलिक इव्हेंट्स म्हणजे सुर्य आणि चंद्र ग्रहण (Chandra Grahan). येत्या वर्षात सुर्य आणि चंद्र ग्रहणाची तारिखही तुम्हाला जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. या वर्षातही अनेकदा सुर्य आणि चंद्र (Surya Grahan) ग्रहणाचे योग आले होते. यावर्षीही सुर्य आणि चंद्र ग्रहणाचे योग आहेत. यावर्षी सुर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहण भारतात कुठे आणि कधी दिसणार आहे याबद्दल जाणून घेऊया या लेखातून. (new year 2023 know the update regarding chandra and surya grahan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 सालचे पहिले चंद्रग्रहण आग्नेय युरोप, हिंद आणि पॅसिफिक महासागर, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे. दोन्ही चंद्र ग्रहणं ही भारतात दिसणार आहेत तर पंचांगनुसार 2023 सालचे दोन्ही सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे दोघांचा सुतक काळ ग्राह्य राहणार नाही. मागच्या वर्षीचे शेवटचे सुर्यग्रहण हे नुकतेच झाले. तेव्हा अनेक खगोलप्रेमींनी हजेरी लावली होती. त्यातून येत्या वर्षातही खगोलप्रेमींसाठी चांगली पर्वणी आहे. तेव्हा खगोल प्रेमींसाठी खगोलशास्त्रीय अभ्यासासाठीही चांगली पर्वणी ठरेल. 


कधी होणार चंद्र आणि सुर्य ग्रहण? 


येत्या वर्षात दोन चंद्र आणि दोन सुर्यग्रहण होणार आहेत. चंद्र आणि सूर्यग्रहण ही घटना ज्योतिषशास्त्रीय, धार्मिक तसेच खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या ग्रहणांचे महत्त्व, परिणाम आणि सुतक काल काय असेल हे जाणून घेणे म्हत्त्वाचे आहे. नवीन वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. पंचांगानुसार सकाळी 7.4 ते 12.29 पर्यंत वेळ लागेल. वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी म्हणजेच शनिवारी होणार असल्याचे कळते. 14 ऑक्टोबर रोजी होणारे सूर्यग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिका आणि आर्क्टिकमध्ये दिसणार आहे. सुर्यग्रहणातही विशेष काळजी घेतली जाते. नवीन वर्षातील पहिले चंद्रग्रहण 5 मे 2023 रोजी होणार आहे. जे 45:45 वाजता सुरू होईल आणि रात्री 1:00 वाजता संपेल तर दुसरे चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 01.06 ते 02.22 पर्यंत सुरू राहील. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)