Gold and Sliver Rates: पुढच्या वर्षा लग्नसराईचा जोरात माहोल पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर सण-सभारंभांना आणि सोनं खरेदी-विक्रीला (Gold and sliver buying) मोठ्या प्रमाणात चालना मिळाली होती. त्यामुळे हीच खरेदी येत्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता आहे, असे दिसते आहे. चला तर मग जाणून घेऊया की येत्या नवीन वर्षात सोन्य - चांदीचे भाव नक्की कसे राहतील. आपल्या खरेदी - विक्रीवरही त्याचा कसा परिणाम होईल. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यात अनेक विवाहसोहळे संपन्न झाले. जानेवारी आणि फेब्रुवारीतही (Wedding seasons and gold price) हा रेट कायम राहणार आहे. नोव्हेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत देशात 32 लाख विवाह झाले आणि होणार आहेत. कोरोनामुळे लोकांनी गुंतवणूकीकडेही वाटचाल सुरू केली आहे. लोकांची मागणीही वाढली आहे. (new year gold and sliver rates gold jumps to 4200 and sliver to 9000 know more)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागच्या वर्षी लग्नसराईचा धमाकेदार माहोल होत यावर्षीही लग्नसराई आणि सभारंभांचा मोठा माहोल पाहायला मिळणार आहे. इंडिया बुलियन्स असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या 1 नोव्हेंबरला सोनं हे 50,000 रूपयांच्या आसपास होते. प्रति 10 ग्रॅमवर हे रेट्स क्लोझ (sliver rates) झाले होते. तर त्याचदिवशी चांदीचा भावही 60,000 पर्यंत गेला होता. डिसेंबर महिन्यात सोन्याचे भाव कमी होत चांदीचे भाव प्रचंड वाढले होते त्यात जवळपास नऊ ते दहा हजारांची वाढ होत ही किंमत 68,000 हजारा प्रति किलोच्या आसपास गेली होती. 


काय असतील येणारे दर?


येत्या वर्षात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यातून कोरोनाच्या पार्श्वभुमीवरही सोन्या चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसली आहे. नोव्हेंबर आणि डिसेबंरच्या महिन्यात तर या दोन्हींमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. मध्यंतरी सोन्याचे भाव (golden rates) थोडे कमी झाले होते परंतु पुढल्या वर्षीही सोन्याच्या दरात वाढ होताना दिसणार असण्याची शक्यता आहे. येत्या वर्षात सोनं आणखीनं वाढण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार येत्या वर्षात सोनं 56,200 रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर चांदी 80,000 रूपयांपर्यतं जाण्याची शक्यता आहे. 


30 डिसेबरची आकडेवारी काय सांगते? 


सोन्याचे भाव 54,867 रुपये प्रति 10 ग्रॅम असून चांदीचा भाव 68,092 रुपये प्रति किलो आहे. त्यावर 3 टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जेस आहेत. 3 कॅरेट सोन्याचा भाव 54,647 रुपये, 22 कॅरेट 50,258 रुपये आणि 18 कॅरेटचा भाव 41,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.