New Year New Rules : बघता बघता 2022 हे वर्ष देखील सरलं आहे. येत्या काही दिवसांत 2023 ( Welcome 2023) या नव्या वर्षाला सुरूवात होणार आहे. पुन्हा एक नवी सुरूवात करण्याच्या आशा अपेक्षेने अनेकजण 1 जानेवारीची वाट पाहत असताना बँकाशी (Rules of Bank) संबंधितीत नववर्षात काही महत्वाचे बदल होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामध्ये 1 जानेवारी 2023 पासून बँक लॉकरशी (bank locker) संबंधित अनेक नियम बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सुधारित अधिसूचनेनुसार, बँका लॉकरच्या बाबतीत मनमानी करू शकणार नाहीत आणि ग्राहकाचे नुकसान झाल्यास त्यांची जबाबदारी सोडू शकणार नाहीत. तसेच एसबीआय (sbi) आणि पीएनबीसह (pnb) इतर बँकांनी ग्राहकांना एसएमएसद्वारे (sms) नवीन नियमांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. पीएनबी ग्राहकांना मिळालेल्या संदेशात असं म्हटलं आहे की, आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, नवीन लॉकर एग्रीमेंट 31 डिसेंबर 2022 पूर्वी लागू केला जाणार आहे.


लॉकर एक्सेसबद्दल SMSआणि EMAIL सूचना


लॉकरमध्ये अनधिकृत एक्सेस केल्यास दिवस संपण्यापूर्वी बँका ग्राहकांचा नोंदणीकृत मेल एड्रेस आणि मोबाइल क्रमांक तारीख, वेळ आणि काही आवश्यक गोष्टींबद्दल माहिती देतील.


फी मध्ये बदल


तसेच SBI च्या मते, बँक लॉकरचे शुल्क क्षेत्रफळ आणि लॉकरच्या आकारानुसार 500 ते 3,000 रुपयांपर्यंत असते. मोठी शहरे आणि महानगरांमधील बँका लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी 2,000 रुपये, 4,000 रुपये, 8,000 रुपये आणि 12,000 रुपये वार्षिक आकारण्यात येतील. 


वाचा :  फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले 


'या' स्थितीत बँका ग्राहकांना देणार पैसे 


रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन मानकानुसार, बँकेच्या निष्काळजीपणामुळे लॉकरच्या कोणत्याही वस्तूंचं नुकसान झाल्यास, बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. तसेच येथील सुरक्षा लक्षात घेऊन सर्व पावलं उचलणं ही बँकांची जबाबदारी आहे. नोटिफिकेशननुसार, बँकेतील कोणतीही कमतरता किंवा निष्काळजीपणामुळे आग, चोरी, दरोडा यासारख्या घटना घडू नयेत याची काळजी घेणं ही बँकांची जबाबदारी आहे.


'या' प्रकरणांमध्ये बँक नुकसानभरपाई देणार नाही


 भूकंप, पूर, वादळ इत्यादी कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे लॉकरमधील सामग्रीचं नुकसान झाल्यास, बँक त्याची भरपाई करण्यास जबाबदार राहणार नाही. याशिवाय, सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर ग्राहकाच्या स्वतःच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे नुकसान झाले असेल तर बँक ग्राहकांना कोणतेही पैसे देणार नाही. दुसरीकडे, अशा आपत्तींपासून बँकांना सुरक्षित ठेवण्यासाठी, लॉकर सिस्टमशी संबंधित काही खबरदारी घ्यावी लागेल.


तसेच आरबीआयने (RBI) म्हटले आहे की,  बँकांना रिकाम्या लॉकरची यादी आणि लॉकरचा प्रतीक्षा यादी क्रमांक प्रदर्शित करावा लागेल. तसेच, जास्तीत जास्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी लॉकरचे भाडे एका वेळी आकारण्याचा अधिकार बँकेकडे आहे. उदाहरणार्थ, लॉकरचे भाडे रु. 1,500 असल्यास, इतर देखभाल शुल्क वगळून बँक तुमच्याकडून रु. 4,500 पेक्षा जास्त आकारू शकत नाही.