`योगी आदित्यनाथ - एक हिंदू दहशतवादी`
अमेरिकेचं चर्चित वर्तमानपत्र `न्यूयॉर्क टाईम्स`नं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना `हिंदू दहशतवादी` म्हणून संबोधलंय.
नवी दिल्ली : अमेरिकेचं चर्चित वर्तमानपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'नं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'हिंदू दहशतवादी' म्हणून संबोधलंय.
'राजनितीच्या पायऱ्या चढणारा एक फायरब्रान्ड हिंदू पुजारी' अशा हेडिंगसहीत योगी आदित्यनाथ यांच्यावर एक लेख छापण्यात आलाय. हिंदू युवा वाहिनीचे नेते म्हणूनही त्यांचा उल्लेख करण्यात आलाय.
भारतातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यावर शासन करण्यासाठी एका महंताला निवडण्यात आलंय. ज्यांच्या भाषणांत द्वेष आढळतो... ज्यांना लोक 'योगी' नावानं ओळखतात. एका हिंदू मंदिराचा पुजारी म्हणून ज्याची ओळख आहे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांचा उल्लेख करण्यात आलाय.
परंपरावादासाठी कुख्यात असलेल्या या महंतानं मुस्लिमांद्वारे केलेल्या ऐतिहासिक चुकांचा बदला घेण्यासाठी हिंदू युवा वाहिनी स्थापन केलीय, असंही यात म्हटलं गेलंय. मस्लिमांना धमकावत गावातून हाकलून लावणं, गाय घेऊन जाणाऱ्यांना मारहाण करणं आणि अशाच अनेक गोष्टींसाठी योगी आदित्यनाथ सतत वादात राहिल्याचा यात उल्लेख करण्यात आलाय. जवळपास दोन डझनपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आदित्यनाथ यांच्या नावावर असल्याचंही यात म्हटलं गेलंय.
तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेले मोदी विकासाच्या मुद्यावर भाषण करत होतं परंतु, आता मात्र भारताला 'हिंदू राष्ट्र' बनवण्याच्या हेतूनं विकासाचा मुद्दा मागे सारलाय.
योगी आदित्यनाथ ज्या गोरखनाथ मंदिराचे महंत राहिलेत त्याचा दहशतावादाचाही एक इतिहास आहे. दिग्विजय नाथ यांना महात्मा गांधी यांच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वी तरुणांची माथे भडकावण्याच्या कारणावरून अटक करण्यात आली होती. तर महंत अवैद्यनाथ यांनी १९९२ मध्ये बाबरी मस्जिद पाडण्यासाठी तरुणांना उकसवलं होतं, असंही या लेखात म्हटलं गेलंय.