Today News In Marathi: अल्पवयीन बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी एका तरुणाने उचलले पाऊल पाहून समाजातून त्याच्यावर कौतुकाची थाप पडत आहे. 6 वर्षांपूर्वी बहिणीवर नराधमांनी बलात्कार केला होता. मात्र, इतकी वर्ष उलटून गेल्यानंतरही त्याची बहिण अद्याप न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. बहिणीला न्याय मिळावा म्हणून तिच्या भावाने एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंत वकिल झाल्यानंतर बहिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींविरोधात केस दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, आता पीडिता 22 वर्षांची आहे. तिच्या म्हणण्यानुसार आरोपींनी अत्याचार केल्यानंतरह कित्येक महिने ती तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस स्थानकांत फेऱ्या मारत होती. मात्र, पोलिसांनी त्यांना अजिबात दाद दिली नाही. तसंच, कोणती कारवाईदेखील केली नाही. आता जवळपास 6 वर्षांनंतर पीडितेच्या भावाने कोर्टाच्या माध्यमातून मुख्य आरोपीसह दोघाजणांविरोधात सोमवारी तक्रार दाखल केली आहे. 


उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील ही घटना आहे. पीडित तरुणी ही 17 वर्षांची असताना 2017 साली तिच्यावर शेजारी राहणाऱ्या जीतूने बलात्कार केला होता. त्याचबरोबर त्याचा मित्र बंटी याने तिचे फोटो काढले होते. पीडितेना याचा विरोध करताच आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होता. त्यानंतर अनेक दिवसांनी पीडितेने आपल्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी याआधारे पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेले तसंच, आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. पीडितेचे कुटुंबीय कित्येक महिने पोलिस ठाण्यात खेटा घालत होते मात्र पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अनेक महिने पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केली नाही. तेव्हा शेवटी हार मानून कुटुंबीयांनी कोणतीही अॅक्शन न घेता घरी परतले. 


पीडितेच्या भावाने बहिणीला न्याय मिळवून देण्याचे ठरवले. भावाने वकील बनवून बहिणीसाठी लढा देण्याचे ठरवले. त्यानंतर दिवसरात्र मेहनत घेऊन तो वकिल बनला आणि जवळपास 6 वर्षषानंतर त्यांनी मुख्य आरोपी जीतू आणि त्याचा मित्र बंटीविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे की, जितूने त्यांच्या मुलीवर बलात्कार केला होता, तर बंटीने त्यांच्या मुलीचे फोटो काढले होते. आरोपी अजूनही मुलीचे फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे.