मुंबई : द नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात करणार आहे. याबाबत एनएचआयने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोल वसुल केला जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या आदेशाला परिवहन उद्योगाशी जोडलेल्या लोकांनी विरोध दर्शवला आहे. सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान २५ मार्चपासून टोल वसुली थांबवली होती. यामुळे आवश्यक वस्तूंची ने-आण करणं सोईचं होईल. 


वाहतूक परिवहन आणि राजमार्ग पर्यटनाने एनआचआयला पत्र लिहिलं होतं की, केंद्रीय मंत्रालयाद्वारे सर्व ट्रक आणि अन्य मालवाहतूक वाहनांना राज्यात फिरण्यासाठी सूट देण्यात आली होती. या आदेशाचं पालन झाल्यानंतर आता २० एप्रिलपासून टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. 



एनएचआयच्या पत्राला उत्तर देताना मंत्रालयाने सांगितलं की, एनएचआयने ११ आणि १४ एप्रिलला पाठवलेल्या पत्रात टोल टॅक्स वसुली सुरू करण्याचं कारण सांगितलं. २० एप्रिलनंतर राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करण्यास परवानगी दिली आहे.