नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण संस्थेने (एनआयए) बिहारमधील गोपाळगंजहून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पकडलेल्या व्यक्तीचे नाव धन्नु राजा उर्फ ​​बेदार आहे. लष्कर-ए-तय्यबाचा एजंट असल्याची एनआयएला शंका आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाळगंजच्या नगर पोलीस स्टेशनच्या जादोपूर चौक जवळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरण खान जो बेनारसमधून पकडला गेला होता त्याने याच्याबद्दल माहिती दिली होती.


माहितीनुसार, भारतीय गुप्तचर संस्था आणि सुरक्षा संस्थांना गोपाळगंजमधून दहशतवादी कारवायाचा संबंध असल्य़ाचे पुरावे मिळाले आहेत. यानंतर ही कारवाई केली गेली. आयबीकडून प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे, एनआयएने धुन्नुला पकडले.


जिल्हा पोलिसांनी धन्नु राजाच्या अटकेची पुष्टी केली आहे. एनआयएच्या या कारवाईनंतर जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण झाली होती. धन्नू सरया मोहल्ला येथे त्यांच्या मामाच्या घरी राहत होता.