श्रीनगर : राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी अर्थात एनआयएनं आज जम्मू काश्मीरमध्ये १२ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याच्या आरोपात अनेक फुटीरतावादी नेत्यांची एनआयएन सध्या चौकशी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळी श्रीनगर, बारामुला, आणि हंदवाडा जिल्ह्यांमध्ये हे धाडसत्र सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी २४ जुलैला एनआयएनं सात जणांना अटकही केली होती. या सातही जणांवर काश्मीर खोऱ्यात अशांती पसरवण्यासाठी आर्थिक मदत पुरवल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे देशविरोधी कारवाया करण्यासाठी काश्मीरी तरूणांना भडवण्याचाही प्रयत्न फुटीरतावादी गटांच्या नेत्यांकडून होत असल्याचा एनआयएचा आरोप आहे.