बोधगयामध्ये बॉम्ब सापडल्यानंतर एनआयएने सुरु केला जोरदार तपास
बोधगयामधील महाबोधी मंदिर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी २ ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली. एनआयएने आता याबाबत कसून चौकशी सुरु केली आहे.
गया : बोधगयामधील महाबोधी मंदिर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी २ ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटकं सापडली. एनआयएने आता याबाबत कसून चौकशी सुरु केली आहे.
दिल्ली येथून बोधगया येथे पोहोचलेली एनआयएची टीम आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. यामागे कोणाचा हात आहे याबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या मागे रोहिंगे मुस्लमी व्यक्तींचा हात असल्याची चर्चा आहे.
बिहार एटीएसने या प्रकरणात अज बेउर जेलमध्ये बंद हैदर अली उर्फ ब्लॅक ब्यूटीची चौकशी केली. याआधी ७ जुलै २००७ ला बोधगयामध्ये झालेल्या ब्लास्टमध्ये मुख्य सूत्रधार हैदर अली उर्फ ब्लॅक ब्यूटी हाच होता.
मंदिर परिसरात मिळालेले स्फोटकं निष्क्रीय करण्याचे प्रयत्न देखील सुरु आहे. मिळालेले बॉम्ब हे हाय इंटेन्सीटीचे असल्याचं देखील समोर आलं आहे. शहरापासून दूर फल्गु नदीच्या किनारे हे बॉम्ब डिफ्यूज केले जातील. यासाठी एक किलोमीटरपासूनच्या अंतरावरून लोकांना लांब पाठवण्यात आलं आहे.