NICL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी दोन प्रकारची पदे ठेवण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट आणि प्रशासकीय अधिकारी जनरलिस्टच्या जागा भरल्या जातील.  प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असावी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर प्रशासकीय अधिकारी जनरलिस्टसाठी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. राष्ट्रीय विमा कंपनी भरती, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत आणि कागदपत्र पडताळणी या माध्यमातून होणार आहे. उमेदवारांची निवड झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. 


नॅशनल इन्शुरन्स कंपनीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला अर्ज भरु शकता. यावेळी तुम्हाला अर्ज शुल्क भरावा लागेल. यानंतर, अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा आणि भविष्यातील उपयोगासाठी अर्जाची प्रिंट आउट घ्या. 


नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी अर्ज शुल्क सर्वसाधारण श्रेणी, इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ₹ 1000 ठेवण्यात आले आहे आणि इतर श्रेणींसाठी 250 रुपये शुल्क असेल. राष्ट्रीय विमा कंपनी भरतीसाठी वयोमर्यादा किमान 21 वर्षे आणि कमाल म्हणजे 30 वर्षे आहे. वय 1 डिसेंबर 2023 रोजी मोजले जाईल आणि सरकारी नियमांनुसार सर्व श्रेणींना वयात सवलत दिली जाणार आहे. 2 जानेवारी पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून उमेदवारांना 22 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपर्यंत अर्ज पाठवावेत. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्या. 


अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा