मुंबई : भारतात कोरोना व्हायरसमुळे सतत नवीन समस्या समोर येत आहे. देशभरात कोरोनामुळे दररोज 3.5 लाखाहून अधिक नवान केसेस आणि 3.5 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. कोरोना विषाणूच्या कोट्यावधी नवीन केसेसमुळे देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. रुग्णांना वेळेवर उपलब्ध होत नाहीत, ना ऑक्सिजन मिळत आहे, ना आवश्यक औषधे मिळत आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर कारणांमुळे देशभरात आरोग्य सुविधांच्या अभावामुळे बरेच रुग्ण मरत आहेत. देशाच्या सद्याच्या परिस्थितीचा विचार करता, केवळ लसीकरणाद्वारेच भारत या क्रूर साथीपासून वाचू शकतो.


देशात कोरोना लसीची तीव्र कमतरता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची झपाट्याने वाढणारी रुग्ण संख्या लक्षात घेता, देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे महत्वाचे आहे. 1 मे पासून देशभरातील 18 वर्षांवरील लोकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण कार्यक्रमात तरुण लोकं भाग घेत आहेत.


परंतु भारतात लसींच्या तीव्र कमतरतेमुळे 18 वर्षावरील लोकांसाठी लसीकरण बर्‍याच ठिकाणी अद्याप सुरू झालेले नाहीत आणि ज्या ठिकाणी लसीकरण सुरू झाले आहे अशा ठिकाणी ही लस वेळेपूर्वीच संपुष्टात येत आहे, ज्यामुळे लसीकरणासाठी केंद्रात तासन तास रांगेत उभे असलेल्या लोकांना घरी परतावे लागले.


लोकांना अद्याप या लसीबद्दल संभ्रम आहे


एकीकडे लोकांना वेळेवर लस मिळत नाही, तर दुसरीकडे काही लोक अजूनही या लसीबाबत संभ्रमित आहेत, तर काहीजण गोंधळलेले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, लसीकरण मोहीम सुरू होण्यापूर्वीच बऱ्याच अफवा भारतात आल्या होत्या ज्यामुळे लोकं सुरुवातीला लस घेण्यासाठी टाळाटाळ करत होते. दरम्यान, सध्या लसींबद्दल अफवा येत आहेत की लसीकरणानंतर, स्त्रियांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो.


NIIRNCD संचालक म्हणाले, काळजी करण्याची काहीच कारण नाही


जोधपूरमधील NIIRNCD चे संचालक डॉ. अरुण शर्मा यांनी असे म्हटले आहे की, महिलांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होते ही बातमी पूर्णपणे निराधार आहे. ते म्हणाले की, कोरोना लसीमुळे स्त्रियांच्या मुलांना जन्म देण्याच्या क्षमतेवर कोणताही वाईट परिणाम होत नाही. हा पूर्णपणे लोकांचा भ्रम आहे आणि याबद्दल काळजी करण्याची काहीच गरज नाही.