नवी दिल्ली : कुठलाही कर्मचारी असो आपल्या कामाला वैतागलेलाच असतो, असे क्वचितचं असतील ज्यांना कामाचा आनंद येत असेल. त्यात सुट्टयांवरूनही कटकट असेल तर आणखीणचं वैताग येतो. त्यामुळे या दोन गोष्टींमुळे कर्मचारी वर्ग नेहमीच वैतागलेला असतो. मात्र या देशातल्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टया पाहून सर्वच कर्मचारी चक्रावले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुवेतमधील सरकारी कर्मचाऱ्यांना सलग नऊ दिवसांची रजा मिळणार आहे. ईद-उल-अधा (बकरीद) निमित्त येथे पाच दिवसांची अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.


स्थानिक मीडियानुसार, ही सुट्टी 10 जुलै ते 14 जुलैपर्यंत असेल. कुवेतमध्ये आठवड्याचे शेवटचे दिवस शुक्रवार आणि शनिवारी असतात. अशाप्रकारे, 8 ते 16 जुलैपर्यंत नऊ दिवसांचा दीर्घ वीकेंड असेल आणि लोक 17 जुलैपासून कामावर परततील.


कुवेत सरकारच्या अधिकृत ट्विटर खात्यानुसार, या कालावधीत सर्व सरकारी मंत्रालये आणि संस्था काम करणार नाहीत. 9 ते 10 जुलै 2022 रोजी ईद अल-अधा आहे. याच्या एक दिवस आधी म्हणजे ८ जुलैला अराफातचा दिवस आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार हा मुस्लिमांचा सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो.


हा हज यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि त्यानंतर ईद अल-अधाचा पहिला दिवस आहे. ईद अल-अधा हा त्यागाचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. संपूर्ण मुस्लिम समाजात प्रेषित अब्राहमचे बलिदान म्हणून त्याची आठवण ठेवली जाते. ईद अल-अधा प्रत्यक्षात धु अल-हिज्जाच्या 10 व्या दिवशी येते, जो इस्लामिक कॅलेंडरचा 12 वा आणि शेवटचा महिना आहे.


ईद अल-अधा हे नाव अरबी भाषेतून आले आहे, ज्याचा अर्थ प्राण्यांचा बळी असा होतो.गेल्या वर्षी यूएईमध्ये ईद अल-अधाची सुट्टी 19 जुलैपासून सुरू झाली आणि 22 जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना मोठी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे येथील कर्मचारी आनंदात आहे.