नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहुल चोकसीचा पासपोर्ट रद्द केला आहे.


पासपोर्ट रद्द


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट रद्द केल्याची माहिती दिली आहे. मंत्रालयाने म्हटलं आहे की, नीरव मोदी आणि मेहुल चोकसीने मंत्रालयाने पाठवलेल्या नोटीसचं उत्तर नाही दिलं. परराष्ट्र मंत्रालयाने नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला कारण दाखवा नोटीस बजावली होती. यावर कोणतंही उत्तर न आल्याने परराष्ट्र मंत्रालयाने कारवाई करत दोघांचे पासपोर्ट रद्द केले आहे.


बँकेला लावली टोपी


संपूर्ण देशात चर्चा असलेल्या पीएनबी गैरव्यवहारात नीरव मोदीनं फक्त बॅंकेलाच नाही तर बॅंकेतल्या ज्या अधिका-यांनी गैरव्यवहार करण्यासाठी मदत केली त्यांनाही टोपी लावली.


२०११ या वर्षात निरव मोदी आणि टीमला तब्बल १५० पेक्षा जास्त एलओयू पत्र जारी करण्यात आले होते. याआधारे परदेशी बॅंकांमधून नीरव मोदीने साडे सात हजार कोटी रुपये काढले होते. त्यानंतर २०१७ पर्यंत नीरव मोदीला आणखी १४३ एलओयू पत्र जारी करण्यात आले होते. त्या माध्यमातून नीरव मोदीने भारतीय कंपन्यांमधून जवळपास ३ हजार कोटी रुपये काढले होते.