नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चारही मारेकऱ्यांना शुक्रवारी फाशी देण्यात येणार आहे. त्यासाठी जल्लाद पवनला तिहारमध्ये मंगळवारपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. मुकेशकुमार सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघांना वीस मार्चला पहाटे फाशी देण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निर्भयाच्या चारही दोषींना अखेर २० मार्चला फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टानं या सर्वांचं डेथ वॉरंट काढलंय. २० मार्चला पहाटे साडे पाच वाजता निर्भयाच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यात येणार आहे. पवन कुमारची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यामुळे या चौघांना फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. आता या सर्वांचे फाशी पुढे ढकलण्याचे सर्व कायदेशीर मार्ग संपले आहेत. त्यामुळे आता सर्वांना २० मार्चला फाशी शिक्षा देण्यात कोणताही अडथळा नाही.  



पवन गुप्ता, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि अक्षय ठाकूर अशी चारही आरोपींची नावे आहे. या चौघांना 20 मार्च रोजी शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता फाशी देण्यात येणार आहे.  पवन कुमारची दया याचिका फेटाळल्यानंतर हा निर्णय आज घेण्यात आला आहे. अखेर निर्भयाला न्याय मिळणार आहे. निर्भयाची आई गेल्या कित्येक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहत होती. 2012 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं.