नवी दिल्ली : निर्भयाचे चारही दोषी पवन, अक्षय, मुकेश आणि विनय यांना सकाळी ५.३० वाजता फाशी देण्यात आली. आजचा दिवस हा 'न्याय दिवस' म्हणून घोषित करावा अशी प्रतिक्रिया समाजातून येत आहे. निर्भयाला अखेर आज न्याय मिळाला आहे. यावेळी निर्भाच्या वडिलांनी दिलेली पहिली प्रतिक्रिया 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक वडिलांच काय कर्तव्य आहे. ही घटना घडली त्यानंतर आम्ही डोळे बंद केले नाही. आम्ही न्यायासाठी प्रयत्न केला आणि अखेर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. वडिलांच कर्तव्य आहे ते आम्ही केलं. म्हणून माझं प्रत्येक वडिलांना एकच सांगायचं आहे. मुलगा आणि मुलीमध्ये फरक करू नका. त्या दोघांना समान वागणूक द्या. तसेच आमची एक मुलगी गेली पण आज आम्हाला लाखो मुली भेटल्या आहेत. आमचं काम इथेच थांबल नाही. आम्हाला थांबायचं असतं तर आम्ही कधीच थांबलो असतो. कारण या नराधमांना फाशी देऊन आमची मुलगी काय परत मिळाली नाही. पण आम्ही लढणार देशातील इतर मुलींसाठी आमचा लढा कायम ठेवणार, अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या वडिलांनी दिली आहे.  चारही क्रूरकर्म्यांना फाशी, अखेर निर्भयाला न्याय) 



'मी माझ्या मुलीचा फोटो उराशी धरला आणि म्हटलं बेटा, आज अखेर तुला न्याय मिळाला. मला माझ्या मुलीचा गर्व आहे. आज जर ती असती तर मी एका डॉक्टरची आई म्हणून ओळखली गेली असती', अशी भावूक प्रतिक्रिा आशा देवींनी व्यक्त केली. गेली सात वर्षे आम्ही निर्भयापासून वेगळे होऊ शकलो नाही. प्रत्येक वेळी आम्ही तिच्या यातना अनुभवल्या आहेत असे आशादेवी म्हणाल्या.(नराधमांना फासावर लटकावल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया)