नराधमांना फासावर लटकावल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया

निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींना आज पहाटे फाशी देण्यात आली.

Updated: Mar 20, 2020, 06:16 AM IST
नराधमांना फासावर लटकावल्यानंतर निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातल्या चौघाही दोषींना आज पहाटे फाशी देण्यात आली. दोषींना फासावर लटकावण्याचा निर्णय कायद्याच्या कचाट्यात सापडत असल्याने याला उशीर होत होता. अखेर हा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर देशभरातून याचे स्वागत होत आहे. आपल्या मुलीला न्याय मिळाला म्हणून गेली आठ वर्षे निर्भयाची आई, आशा देवी न्यायालयाकडे न्याय मागत होत्या. अखेर त्यांच्या मुलीला न्याय मिळाला आहे. तब्बल आठ वर्षांनी निर्भयाच्या चारही दोषींना तिहार जेलमध्ये फाशी

फाशी टाळण्यासाठी त्यांच्या वकिलांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले. 

गेली सात वर्षे आम्ही निर्भयापासून वेगळे होऊ शकलो नाही. प्रत्येक वेळी आम्ही तिच्या यातना अनुभवल्या आहेत असे आशादेवी म्हणाल्या.

रात्री हायकोर्टानं याचिका फेटाळल्यानंतर सर्वात शेवटचा प्रयत्न म्हणून दोषींचे वकील ए पी सिंग यांनी मध्य रात्रीनंतर अडीच वाजता सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा दाद मागितली. मात्र सर्व प्रयत्न अपयशी ठरले. पहाटे या दोषींना फाशी देण्यात आली. 

उशीरा का होईना निर्भयाला न्याय मिळाला. यासाठी मी संपूर्ण देशाचे धन्यवाद मानते. आजचा सुर्योदय हा देशातील मुलींच्या नावे असल्याची प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली. २० मार्च हा दिवस निर्भयाच्या नावे, देशातील मुलींच्या नावे लक्षात ठेवला जाईल असेही त्या म्हणाल्या.

जस्टिस आर भानुमती, जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस ए एस बोपन्ना यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे युक्तीवाद केला. यावेळी चौघांपैकी एक दोषी पवन याच्या वयाचा मुद्दा सिंग यांनी सुप्रीम कोर्टात मांडला. त्यावर आक्षेप घेत, कनिष्ठ न्यायालय, दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही या आधी अल्पवयीन असल्याचा मुद्दा नाकारल्याचं खंडपीठानं सांगितलं. तसंच या पूर्वी झालेल्या सुनावणीतलेच मुद्दे आताही मांडले जात असल्याकडेही खंडपीठानं दोषींचे वकील ए पी सिंग यांचं लक्ष वेधलं.

चौघा दोषींचा दयेचा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळला आहे, त्याला तुम्ही कशाच्या आधारावर आव्हान देत आहात असा थेट प्रश्न यावेळी खंडपीठानं विचारला. आणि ही याचिका निकाली काढली. त्याबरोबरच दोषींची फाशी टाळण्याचा त्यांच्या वकिलांचा अखेरचाही प्रयत्न फोल ठरला. आणि फाशीचा मार्ग मोकळा झाला.