NIRF Rankings 2024: देशातील टॉप शैक्षणिक संस्थाची यादी जाहीर, IIT मुंबई कितव्या स्थानी? जाणून घ्या
NIRF Rankings 2024: आयआयएसई बंगळूर रॅंकींगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटीनी एनआयआरएफ रॅंकिंग 2024 च्या इंजिनीअरिंग श्रेणीमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय.
NIRF Rankings 2024: केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नुकतीच राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (National Institutional Ranking Framework, NIRF) जाहीर केले आहे. दरवर्षी जाहीर होणाऱ्या एनआयआरएफ रॅंकींगमध्ये विविध मानदंडांच्या आधारे भारतातील उच्च शिक्षण संस्थांचे मुल्यांकन आणि रॅंकींग केले जाते. एनआयआरएफ रॅंकींग 2024 मध्ये आयआयटी मद्रास नंबर 1 वरआहे. आयआयएसई बंगळूर रॅंकींगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आयआयटीनी एनआयआरएफ रॅंकिंग 2024 च्या इंजिनीअरिंग श्रेणीमध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये आयोजित कार्यक्रमात 13 कॅटगरीचे रॅंकींग जाहीर करण्यात आले.
इंजिनीअरिंगच्या टॉप संस्था
आयआयटी मद्रास
आयआयटी दिल्ली
आयआयटी मुंबई
ईट कानपूर
आयायटी खरगपूर
आयआयडी रुरकी
आयआयटी गुवाहाटी
आयआयटी हैदराबाद
एनआयटी तिरुपचिरापल्ली
आयआयटी-बीएचयू वाराणसी
आयआयटी बंगळुरु
यावर्षीच्या मेडिकल कॅटरगीमध्ये एम्स दिल्लीने टॉप केले आहे. कॉलेज कॅटेगरीमध्ये हिंदू कॉलेजने टॉपचे स्थान मिळवले आहे. आयआयएम अहमदाबादने मॅनेजमेंट कॅटेगरीमध्ये टॉप केलंय. आयआयएससी बंगळुरुला सर्वश्रेष्ठ भारतीय विश्वविद्यालय, आयआयटी मद्रासला सर्वश्रेष्ठ इंजिनीअरिंग संस्था म्हणून निवडण्यात आलंय.